दीड वर्षाच्या मुलीची ओमिक्रोनवर यशस्वीपणे मात

दीड वर्षाच्या मुलीची ओमिक्रोनवर यशस्वीपणे मात

पुणे(प्रतिनिधी)- Pune

पिंपरी-चिंचवड (pimpri chinchwad)परिसरातील ओमिक्रोनची (omicron)लागण झालेल्या एका दीड वर्षाच्या मुलीने ओमिक्रोनवर यशस्वीपणे मात केली आहे. पूर्णपणे संसर्गातून बाहेर आल्यानंतर रुग्णालयातून (Hospital)तिला डिस्चार्जही देण्यात आला आहे.

तिच्या कुटुंबातील सदस्य नायजेरियातील भारतीय वंशाची महिला आणि त्यांच्या दोन मुलींच्या संपर्कात आल्यानंतर त्या मुलीला ओमिक्रॉनची (omicron)लागण झाली. यानंतर कुटुंबाला वेगळे करून उपचार केले जात होते. त्याचवेळी या भागात एका तीन वर्षांच्या मुलालाही कोरोनाच्या ओमिक्रॉन या नवीन प्रकाराची लागण झाली आहे. या मुलाला संसर्गाची कोणतीही चिन्हे दिसत नाहीत तसेच त्याची प्रकृती ठीक आहे.

दरम्यान, पुणे, पिंपरी-चिंचवड परिसरात ओमिक्रोनची चार नवीन प्रकरणे नोंदवली गेली आहेत. यामध्ये एका तीन वर्षाच्या मुलाचा समावेश आहे. पिंपरी चिंचवड महापालिका क्षेत्रातच हे चार नवीन रुग्ण आढळून आले आहेत. या बालकाव्यतिरिक्त अन्य तीन रुग्णांमध्ये दोन पुरुष आणि एक महिला आहे.

हे सर्व लोक नायजेरियातून परतल्यावर संक्रमित आढळलेल्या भारतीय वंशाच्या महिला आणि तिच्या दोन मुलींच्या संपर्कात आले होते. चार नवीन रुग्णांपैकी तीन वर्षांच्या मुलामध्ये संसर्गाची कोणतीही चिन्हे दिसत नाहीत.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com