
नाशिक | Nashik
पुणे-नाशिक महामार्गावरील (Pune-Nashik Highway) चांडोली टोलनाक्यावर (Chandoli Toll Plaza) तीन वाहनांचा विचित्र अपघात (Accident) झाल्याची घटना घडली आहे. सुदैवाने या अपघातात कुठलीही जीवितहानी झाली नसून काहीजण गंभीर जखमी झाले आहेत...
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, दूध वाहतूक करणाऱ्या दोन ट्रकमध्ये हा अपघात झाल्याचे समजते असून अपघातात दोन्ही वाहन चालक गंभीर जखमी (Injured) झाल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच जखमींना पुढील उपचारासाठी नजिकच्या खासगी रुग्णालयात (Private Hospital) दाखल करण्यात आले आहे. हा अपघात इतका भीषण होता की, चालकाला वाहनातून खेचून बाहेर काढावे लागले आहे.
दरम्यान, या अपघातामुळे महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी (Traffic Jam) झाली असून नाशिककडे (Nashik) येणाऱ्या वाहनांच्या चार ते पाच किलोमीटरपर्यंत रांगा लागल्या आहेत. तसेच अपघाताच्या घटनेची माहिती मिळताच खेड पोलीस (Khed Police) घटनास्थळी दाखल झाले असून वाहने बाजूला करण्याचे काम सुरु आहे.