Mumbai Fire : मुंबईतील हॉटेल गॅलेक्सीला भीषण आग, ३ जणांचा मृत्यू

Mumbai Fire : मुंबईतील हॉटेल गॅलेक्सीला भीषण आग, ३ जणांचा मृत्यू

मुंबई | Mumbai

मुंबईतील सांताक्रूझ (Santacruz area of ​​Mumbai) परिसरातील गॅलेक्सी हॉटेलला (Galaxy Hotel) भीषण आग लागली आहे. या आगीत आतापर्यंत ३ जणांचा मृत्यू झाला असून दोन जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.

रविवारी म्हणजेच आज दुपारी एक वाजण्याच्या सुमारास ही आग लागली. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. अग्निशमन दलाच्या जवानांकडून आग विझवण्याचे काम अद्यापही सुरूच आहे. आग कशामुळे लागली याची माहिती अजून मिळून शकलेली नाही.

Related Stories

No stories found.
   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com