Accident News : पर्यटकांची कार दरीत कोसळून भीषण अपघात; तीन ठार, चार जण गंभीर जखमी

Accident News : पर्यटकांची कार दरीत कोसळून भीषण अपघात; तीन ठार, चार जण गंभीर जखमी

अमरावती | Amravati

येथील परतवाडा ते चिखलदरा मार्गावर (Patrwada to Chikhaldara Marg) मोथा गावानजीक चिखलदरा येथे जात असलेल्‍या पर्यटकांची कार (Tourist Car) २०० फूट खोल दरीत कोसळून भीषण अपघात (Terrible Accident) झाल्याची घटना घडली आहे. या आघातात तिघांचा मृत्यू (Death) झाला असून चार जण गंभीर जखमी झाले आहेत....

Accident News : पर्यटकांची कार दरीत कोसळून भीषण अपघात; तीन ठार, चार जण गंभीर जखमी
PM Narendra Modi Birthday : लहानपणीचे कष्टाळू, गुजरातचे मुख्यमंत्री ते जगातील प्रभावशाली नेते पंतप्रधान मोदी

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, अपघातग्रस्‍त कारमधील प्रवासी हे तेलंगणातील (Telangana) आदिलाबाद (Adilabad) येथील रहिवासी असल्याचे समोर आले असून कारचालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटून कार दरीत कोसळल्‍याचे सांगण्‍यात येत आहे. तेलंगणातील पर्यटक एपी २८ डी.डब्‍ल्‍यू २११९ क्रमांकाच्‍या अर्टिगा कारने चिखलदरा (Chikhaldara) येथे जात असताना आज रविवार (दि.१७ सप्टेंबर) रोजी सकाळच्या सुमारास हा अपघात घडला.

Accident News : पर्यटकांची कार दरीत कोसळून भीषण अपघात; तीन ठार, चार जण गंभीर जखमी
New Parliament : नव्या संसद भवनावर फडकला तिरंगा; उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या हस्ते ध्वजारोहण

दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच चिखलदरा पोलिसांनी (Chikhaldara Police) घटनास्‍थळी धाव घेतली. त्यानंतर पोलिसांनी जिल्‍हा आपत्ती व्यवस्थापनाशी संपर्क साधला असता ते देखील तातडीने घटनास्थळी पोहोचले. यानंतर जखमी प्रवाशांना रुग्‍णालयात हलविण्‍यात आले आहे. तर मृतांची आणि जखमींची नावे अद्याप समजू शकलेली नाहीत.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा...

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com