डोकेदुखी वाढली, डेल्टा प्लसचे आणखी तीन प्रकार आढळले

डोकेदुखी वाढली, डेल्टा प्लसचे आणखी तीन प्रकार आढळले

मुंबई | Mumbai

राज्यात डेल्टा प्लस व्हेरिएंट (Delta-Plus Variant) चे पाच बळी गेल्यानंतर आता डेल्टा प्लस व्हेरिएंटचेच अजून ०३ प्रकार आढळून आल्याने खळबळ उडाली आहे...

सध्या या व्हेरिएंट्सच्या प्रसाराबाबत अधिक संशोधन करणं गरजेचे आहे. मात्र आताच्या घडीला राज्यात डेल्टा प्लस व्हेरिएंटचे ६६ रूग्ण आहेत. त्यामध्ये Ay.1, Ay.2 आणि Ay.3 या डेल्टा प्लस व्हेरिएंटच्या उपप्रकरांचा समावेश असल्याची माहिती जिनोम सिक्वेंसिंगच्या अहवालातून समोर आली आहे.

वेगाने पसरणार्‍या डेल्टा व्हेरिएंट मध्ये म्युटेशन झाल्यानंतर डेल्टा प्ल्स व्हेरिएंट समोर आला होता. आता संशोधकांना या डेल्टा प्लस व्हेरिएंट मध्येही १३ अजून उप प्रकार असल्याचं आढळलं आहे. डेल्टा प्लस व्हेरिएंट मध्ये Ay.1 ते Ay.13 असे तेरा विविध उपप्रकार आहेत. यापैकी पहिले ०३ महाराष्ट्रात आहेत.

मोनोक्लोनल अँटीबॉडीज कॉकटेलच्या (Monoclonal Anti Bodies Cocktail) उपचारांमध्ये डेल्टा प्लस व्हेरिएंट हा प्रतिरोधक असल्याचं समोर आलं होतं. राज्यात ६६ केसेसमधील ३१ केसेस या Ay.1च्या आहात, ३० केसेस या Ay.3 च्या आहेत तर Ay.2 च्या १० केसेस आहेत. Ay.1या एप्रिल महिन्यापासून आढळल्या आहेत. Ay.०२ मार्च महिन्यापासून आढळल्या आहेत तर Ay.3 जून महिन्यापासून समोर आल्या आहेत.

संशोधकांच्या मते Ay.3 हा प्रकार अमेरिकेच्या काही भागात झपाट्याने पसरत आहे. हा नॉन स्पाईक प्रोटीन म्युटेशन असून त्याच्याबद्दल अजूनही फारशी माहिती उपलब्ध नाही.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com