राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या पदाधिकाऱ्याकडे खंडणी मागणाऱ्या तिघांना अटक

राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या पदाधिकाऱ्याकडे खंडणी मागणाऱ्या तिघांना अटक

पुणे |प्रतिनिधी| Pune

प्लॉटवर टाकलेला राडा रोडा उचलण्यासाठी राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या पदाधिकाऱ्याकडे ४ लाख रुपयांची खंडणी मागून ती घेत असताना खंडणी विरोधी पथकाने सापळा रचून तिघा जणांना रंगेहाथ पकडले.

दीपक विजय निंबाळकर (वय २९, रा. निंबाळकरवस्ती, पिसोळी, ता. हवेली), गणेश जगताप (वय २८, रा. महम्मदवाडी, हडपसर) आणि अमर अबनावे (वय २९ रा. उरळी देवाची) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

याप्रकरणी जुबेर बाबु शेख (वय ४१, रा. कासेवाडी, भवानी पेठ) यांनी फिर्याद दिली आहे. जुबेर शेख हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पुणे शहर चिटणीस आहेत. त्यांचा प्लॉट खरेदी विक्रीचा व्यवसाय आहे. फिर्यादी यांचे पिसोळी येथे दोन ठिकाणी मिळकती आहेत. त्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर दिपक निंबाळकर याने राडारोडा टाकला होता. तो राडारोडा उचलण्यासाठी फिर्यादी व त्यांचा मित्र सचिन ननावरे यांनी फोन करुन सांगितले.

हा राडारोडा उचलण्यासाठी दीपक निंबाळकर व त्याच्या साथीदारांनी फिर्यादी यांच्याकडे ४ लाख रुपयांची मागणी केली. त्यांना पैसे घेऊन कोंढवा कात्रज रोडवरील कान्हा हॉटेल येथे बोलावले. शेख यांनी याची तक्रार खंडणी विरोधी पथकाकडे केली. सोमवारी दुपारी शेख हे ४ लाख रुपये घेऊन कान्हा हॉटेल येथे गेले.

शेख यांच्याकडून खंडणीची रक्कम स्वीकारताना पोलिसांनी तिघांना सापळा रचून पकडले. पोलीस तपास करीत आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com