राज्यातील साडेतीनशे उपशिक्षणाधिकारी पदांना लागणार कात्री

राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने वित्त विभागाला यासंबंधीचा प्रस्ताव सादर केला आहे
राज्यातील साडेतीनशे उपशिक्षणाधिकारी पदांना लागणार कात्री

संगमनेर | वार्ताहर | Sangamner

राज्यातील शालेय शिक्षण विभागात कार्यरत असलेल्या प्रशालेतील मुख्याध्यापकांची राजपत्रित मुख्याध्यापकांची 356 पदे कमी होणार आहेत. त्यामुळे शालेय शिक्षण विभागात कार्यरत असलेल्या वर्ग दोनच्या पदांत मोठ्या संख्येने घट होणार आहे.

राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने वित्त विभागाला यासंबंधीचा प्रस्ताव सादर केला आहे. वित्त विभागाने यासंबंधीची अधिक माहिती मागवली असून या प्रस्तावाला लवकरच मान्यता मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्यातील विदर्भ व मराठवाड्यात कार्यरत असलेल्या साडेतीनशे पेक्षा अधिक राजपत्रित मुख्याध्यापकांची पदे रद्द करून सध्याच्या कार्यरत असलेल्या जिल्हा परिषदेतील शिक्षकांना त्या पदावरती राजपत्रित म्हणून बढती देण्याची संधी निर्माण होईल. मात्र शालेय शिक्षण विभागातील राजपत्रित मुख्याध्यापकांची 356 पदे कायमस्वरूपी रद्द होणार आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com