लसींचे दोन डोस घेतलेल्यांना ‘आरटीपीसीआर’मधून सूट

देशांतर्गत, आंतरराष्ट्रीय प्रवाशांनाही सूट लागू
लसींचे दोन डोस घेतलेल्यांना ‘आरटीपीसीआर’मधून सूट

मुंबई | प्रतिनिधी Mumbai


ज्यांनी करोना प्रतिबंधित ( Corona Vaccine) दोन्ही लसी घेतल्या असतील आणि लसी घेतल्यानंतर १५ दिवसांचा अवधी उलटला असेल अशांना राज्यात प्रवेश करण्यासाठी ‘आरटीपीसीआर’ चाचणीचा ( RTPCR Test ) निगेटीव्ह अहवाल सादर करण्याची गरज राहणार नाही, असे राज्य सरकारने स्पष्ट केले आहे. देशांतर्गत तसेच आंतरराष्ट्रीय प्रवाशांनाही ही सूट लागू असेल, असेही या आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.

मात्र,दोन डोस घेतलेल्या अशा व्यक्तींकडे केंद्र सरकारच्या ‘कोविन’ या पोर्टलवरून प्राप्त केलेले अधिकृत प्रमाणपत्र असणे बंधनकारक आहे, असे आदेश मुख्य सचिव सीताराम कुंटे ( Chief Secretary Sitaram Kunte ) यांनी जारी केले आहेत.

ही सूट लागू असली तरीही लसीकरण झालेल्या अथवा न झालेल्या सर्व प्रवाशांना कोरोना रोखण्यासाठी चेहऱ्यावर मास्क परिधान करणे, वेळोवेळी हात स्वच्छ धुणे, शारिरीक अंतर राखणे आदी नियमांचे पालन करणे बंधनकारक राहणार आहे.

इतर सर्व नागरीकांसाठी ‘आरटीपीसीआर’ चाचणीच्या वैधतेचा काळ ४८ तासांवरून वाढवून तो ७२ तास इतका करण्यात आला आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com