ज्यांचे तीनवेळा विनामास्क फोटो पुढे येतील त्यांना तिकीट नाही -  सुप्रिया सुळे
खासदार सुप्रिया सुळे

ज्यांचे तीनवेळा विनामास्क फोटो पुढे येतील त्यांना तिकीट नाही - सुप्रिया सुळे

इंदापूर - ज्या सदस्यांचे तीन वेळा विनामास्क फोटो पुढे येतील त्यांना तिकीटच देऊ नका, असा आदेशच सुप्रिया सुळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षांना दिला आहे. खासदार सुप्रिया सुळे गुरुवारी (दि. 17) इंदापूर दौर्‍यावर होत्या.

त्यावेळी एका कार्यक्रमात त्या बोलत होत्या. सुप्रिया सुळे म्हणाल्या, करोनामुळे अनेक कुटुंब उध्वस्त झाली आहेत. यात बर्‍याच कुटुंबांनी तर आपला कर्ता माणूस गमावला आहे. त्याचबरोबर दुसरीकडे आई किंवा वडील तर काही कुटुंबात दोघांनाही कोरोनाने हिरवल्यामुळे अनेक मुलं अनाथ झाली आहे. अशा प्रतिकूल परिस्थितीत या मुलांना आधाराची खूप आवश्यकता आहे. अनाथ झालेलं एकही मुल मायेच्या आधारापासून वंचित राहू नये यासाठी केंद्र आणि राज्य सरकारच्या यंत्रणांनी परस्पर सामंजस्य व गांभीर्याने काम करण्याची आवश्यकता आहे.

अजितदादांचा मास्क दीड वर्षात खाली आला नाही. कुठल्या कारणासाठी मास्क काढावा लागला तर ते काही सेकंदात पुन्हा घालतात, अशा शब्दात त्यांच्यावर कौतुक केले आहे. अशावेळी माझी जिल्हाध्यक्षांना विनंती आहे की, ज्या सदस्यांचे तीन वेळा विनामास्क फोटो पुढे येतील त्यांना तिकीटच देऊ नका.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com