तिसर्‍या लाटेत 85 टक्के लहान मुलांना संसर्गाचा धोका नाही

टास्क फोर्सचा अंदाज
तिसर्‍या लाटेत 85 टक्के लहान मुलांना संसर्गाचा धोका नाही

पुणे / Pune - देशात पुढील तीन-चार महिन्यांत करोनाची तिसरी लाट (Third wave of COVID-19) येणार असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. ही लाट आधीपेक्षा भयंकर असेल असे म्हटले जात आहे. दरम्यान, संभाव्य तिसर्‍या लाटेत 85 टक्के लहान मुलांना संसर्गाचा धोका असणार नाही, असा अंदाज लहान मुलांसाठी स्थापन केलेल्या टास्क फोर्सने वर्तविला आहे.

तिसर्‍या लाटेमध्ये लहान मुलांना बाधा होऊ शकते, असे भाकित गेल्या अनेक दिवसांपासून वर्तविले जात आहे. त्यादृष्टीने खबरदारी म्हणून देश, राज्य आणि स्थानिक स्वराज्यसंस्था पातळीवर टास्क फोर्स स्थापन करून उपाययोजना सुरू आहेत.

अर्थात, हा अंदाज असला तरी तो चुकूही शकतो त्यामुळे मुलांची काळजी घेणे आणि उपचारासाठी उपाययोजना करणे महत्त्वाचे ठरणार आहे.

राज्यातील टास्क फोर्सच्या सदस्या प्रो. डॉ. आरती किणीकर (Professor Dr. Aarti Kinikar) यांनी सांगितले, या लाटेमध्ये जवळपास 15 टक्के मुलांना रुग्णालयात दाखल करावे लागेल, असा अंदाज टास्क फोर्सचा आहे. रुग्णालयात उपचार घेणार्‍या 15 टक्क्यांपैकी केवळ एक-दोन टक्केच मुलांना व्हेंटिलेटर किंवा अधिक उपचाराची गरज भासू शकेल. त्यातूनही गंभीर होणार्‍या मुलांमध्ये जन्मापासूनच अन्य शारीरिक व्याधी असणार्‍या मुलांचा समावेश असू शकतो. त्यामध्ये मेंदूविकार, हृदयविकार किंवा अन्य गंभीर आजार यांचा समावेश आहे.

जर पुढच्या लाटेमध्ये बाधितांमध्ये लहान मुलांचे प्रमाण जास्त असेल तर त्यातील 85 टक्के मुलांना अतिसौम्य लक्षणे असतील. राज्यातील वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये प्रत्येकी 20 आयसीयू आणि 10 एनआयसीयू उभे करण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी 105 कोटी रुपये नुकतेच मंजूर झाले आहेत. याशिवाय, स्थानिक स्वराज्य संस्थांमधील रुग्णालयांमध्ये जेथे बालकांवर उपचार केले जावू शकतात तेथे अशा सोयी उभारता येणार आहेत. रुग्णालयांमध्ये व्हेंटिलेटर्स, अन्य मूलभूत सुविधा आणि साहित्य याची उपलब्धता होऊ शकणार आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com