छेडछाड करणाऱ्या तरुणाचे महिलेने गुप्तांग कापले

छेडछाड करणाऱ्या तरुणाचे महिलेने गुप्तांग कापले

पुणे |प्रतिनिधि| Pune

एका महिलेने छेडछाड करणाऱ्या तरुणाला अद्दल घडविण्यासाठी त्याला व्हॉटस्अॅपवर अश्लील चॅटिंग करुन त्याला बोलावून घेऊन साथीदारांच्या सहाय्याने त्याचे लिंग कापल्याचा धक्कादायक प्रकार पुण्याच्या कात्रज भागात घडल्याने खळबळ उडाली आहे. संबंधित महिला पुण्यातील एका मयत झालेल्या गुंडाची पत्नी आहे.

याप्रकरणी पूनम निलेश वाडकर हिला अटक करण्यात आली आहे. तिच्यासह इतर तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनला याप्रकरणी गुन्हा दाखल झाला असून याबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एक तरुण सतत या महिलेची छेड काढत होता. या छेडछाडीला कंटाळून तरुणीने आपल्या तीन साथीदारांसह मिळून तरुणाला मारहाण करत त्याचे लिंग कापले आहे. दिनांक १२ नोव्हेंबर रोजी आरोपी पुनम निलेश वाडकर हिने तक्रारदार तरुणाशी व्हॉटस्अॅपवर चॅटिंग करुन त्यांला स्वामी नारायण मंदिर, आंबेगाव खुर्द, पुणे येथील चौपाटीवरील हॉटेलसमोर भेटण्यासाठी बोलावले होते.

तरुण हा त्याठिकाणी आल्यानंतर आरोपी पुनम निलेश वाडकर ही त्याठिकाणी तिच्या इतर तीन साथीदारांसह आली. त्या तीन साथीदार यांनी तरुणाला गाड्यांच्या चाव्यांनी डोक्यात मारहाण केली, तसेच हाताने आणि लाथा-बुक्क्यांनी मारहाण करुन डोक्यात दगड मारुन जखमी केले. एवढंच नाही, तर धारदार हत्याराचा धाक दाखवून तरुणाला जबरदस्तीने गाडीवर बसवून त्याला मुंबई-बेंगळुरू हायवेने नवीन कात्रज बोगद्यातुन शिंदेवाडी येथून कात्रज जुना बोगदा खेड शिवापुरच्या बाजूच्या रोडपासून थोडे पाठीमागे असलेल्या रस्त्याने आडबाजूला नेले.

गाडीवर बसलेल्या एकाने तरुणाला दमदाटी केली. "तु पुनमला लॉजवर घेऊन जाणार का? तुला बायकांना फसवायला पाहिजे? असे म्हणून "थांब तुझा -- कापतो” असं म्हणत आरोपी पुनम वाडकर आणि तिच्या इतर दोन साथीदारांनी तरुणाला खाली पाडून पकडून ठेवले. तर दुसऱ्या इसमाने त्याच्या जवळील धारदार हत्याराने तरुणाच्या गुप्त इंद्रियावरील कातडी कापून काढली. नंतर तेच हत्यार तरुणाच्या डोक्यात मारत तरुणाला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. तसेच लाथा-बुक्क्यांनी मारहाण करुन तरुणाला गंभीर जखमी केले. एवढंच नाही, तर पोलिसांकडे तक्रार केल्यास खानदान संपवून टाकण्याची धमकी तरुणाला दिली.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com