दहावी निकालाची हँग झालेली वेबसाईट ‘या’ वेळेत होणार सुरु

राज्य शिक्षण मंडळाची माहिती
दहावी निकालाची हँग झालेली वेबसाईट ‘या’ वेळेत होणार सुरु

पुणे / Pune - करोनामुळे राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (Maharashtra State Board of Secondary & Higher Secondary Education) इयत्ता 10वीच्या परीक्षा होऊ शकल्या नसल्या तरी विद्यार्थ्यांच्या अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे आज निकाल जाहीर करण्यात आला आहे.

दुपारी 1 वाजता हा निकाल विद्यार्थ्यांना पाहता येणार होता. मात्र निकालाची वेबसाइट हँग झाल्यामुळे विद्यार्थ्यांना अडचणी येत होत्या. साधारणतः 16 लाख विद्यार्थी या परिक्षेला बसले होते. या निकालाची उत्सुकता असताना वेबसाइट हँग झाली आहे.

अचानक वेबसाईट्सचे यूजर वाढल्यानं ही साईट हँग झाल्याची माहिती आहे. मात्र आता ही समस्या सोडवण्यासाठी चार तास झाले तरी वेबसाईट सुरु झाली नाही. वेबसाईट कधी सुरु होईल, याची माहिती राज्य शिक्षण मंडळाचे अध्यक्ष दिनकर पाटील यांनी दिली आहे. अर्ध्या तासात दहावीच्या निकालाची वेबसाईट सुरू होईल असे दिनकर पाटील म्हणाले आहेत.

http://result.mh-ssc.ac.in या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांना निकाल पाहता येणार आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com