यूपीआयद्वारे व्यवहारांचे प्रमाण वाढले

यूपीआयद्वारे व्यवहारांचे प्रमाण वाढले

नवी दिल्ली -

युनिफाईड पेमेंट इंटरफेस अर्थात् यूपीआयद्वारे व्यवहारांचे प्रमाण वाढले असल्याची माहिती निती आयोगचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमिताभ कांत यांनी

दिली दिली आहे.

जानेवारी महिन्यात यूपीआयद्वारे 2.3 अब्ज व्यवहारांच्या माध्यमातून तब्बल 4.2 ट्रिलियन रुपयांची देवाण-घेवाण झाली, अशी माहिती निती आयोगचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमिताभ कांत यांनी दिली.

यूपीआय व्यवहारांचे प्रमाण 76.5 टक्क्यांनी, तर पैशांच्या चुकार्‍याचे प्रमाण 100 टक्क्यांनी वाढले, असेही त्यांनी सांगितले. जानेवारीत यूपीआयच्या मंचावर 2.3 अब्ज व्यवहाराची नोंद करण्यात आली. थोडे थोडके नव्हे, तर 4.3 ट्रिलियन रुपयांचे व्यवहार या कालावधीत करण्यात आले. दरवर्षीच्या आधारावर यूपीआय व्यवहार 76.5 टक्क्यांनी आणि या व्यवहारांचे मूल्य 100 टक्क्यांनी वाढले. यूपीआयच्या व्यवहारांनी तीन वर्षांत 1 अब्ज व्यवहारांचा पल्ला गाठला. पुढचे एक अब्ज व्यवहार वर्षापेक्षा कमी अवधीत होतील, असे ट्विट कांत यांनी केले.

यूपीआय ही एक विशिष्ट यंत्रणा असून, या माध्यमातून वित्तीय संस्थांना सेल्युलर सॉफ्टवेअरच्या माध्यमातून व्यवहार करणे शक्य होते. त्यामुळे बँकिंग व्यवहारांना पर्याय उपलब्ध झाला आहे. या माध्यमातून व्यक्ती ते व्यक्ती व्यवहार अत्यंत सहजपणे करणे शक्य झाले आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com