सेट परीक्षेसाठी मुदतवाढ

विलंब शुल्कासह २५ जूनपर्यंत करता येणार अर्ज
सेट परीक्षेसाठी मुदतवाढ

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे वरिष्ठ महाविद्यालयात सहाय्यक प्राध्यापक पदासाठी सेट परिक्षा २६ सप्टेंबरला होणार आहे. महाराष्ट्र आणि गोवा राज्यात ही सेट परिक्षा घेतली जाणार आहे...

पुणे विद्यापीठाने महत्वाच्या परीक्षांसंदर्भात अनेक तारखांची घोषणा आधीच केली होती. त्यानुसार सेट परिक्षा अर्ज भरण्यासाठी १७ मे २०२१ ला सुरुवात झाली.

१० जुन ही अर्ज भरण्यासाठी अंतिम तारीख दिली होती. परंतु कोरोना परिस्थितीचा विचार करुन ज्यांनी अजून अर्ज भरले नाहीत्त, त्यांच्यासाठी १७ जूनपर्यंत तारीख वाढवून दिली होती. आता विलंब शुल्क भरुन दि. २५ जूनपर्यंत अर्ज भरण्याची मुदत वाढविण्यात आली आहे.

अर्ज भरण्याची प्रक्रिया पुर्ण झाल्यानंतर दुरुस्तीसाठी ३० जूनपर्यंत वेळ देण्यात आला आहे. परिक्षेसाठीचे प्रवेश पत्रक विद्यापीठाच्या संकेतस्थळावर दि.१६ सप्टेंबरला उपलब्ध केले जाणार आहे.

अशी होईल परीक्षा

परीक्षेसाठी बहुपर्यायी प्रश्‍न विचारले जातील. एकाच दिवशी दोन वेगवेगळ्या सेशनमध्ये परिक्षा होईल. एक तासाच्या कालावधीत पहिल्या पेपरमध्ये ५० प्रश्‍न प्रत्येकी २ गुणासाठी तर दोन तासाच्या दुसऱ्या पेपरसाठी २ गुणांचे प्रत्येकी १०० प्रश्‍न असतील. अशी एकूण ३०० गुणांची परिक्षा होईल.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com