कोकणवासीयांना थेट मदत मिळावी

- विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांची मागणी
कोकणवासीयांना थेट मदत मिळावी

मुंबई । प्रतिनिधी

चक्रीवादळामुळे कोकण किनारपट्टी उद्ध्वस्त झाली असून बाधिताना पुन्हा उभे करण्यासाठी केवळ कागदी आदेश आणि घोषणा पुरेशा नसल्याचे सांगत विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी मंगळवारी राज्य सरकारने नुकसानग्रस्तांना थेट मदत द्यावी, अशी मागणी केली.

राज्य सरकारने आढावा घेण्यात वेळकाढूपणा न करता तातडीने पंचनामे करून मदतीचे वाटप शेतकऱ्यास देऊन त्यांना दिलासा द्यावा, असेही दरेकर यांनी प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.

तौक्ते चक्रीवादळाच्या तडयाख्यामुळे अलिबाग तसेच रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यात शेतीलमाल, घरांचे प्रचंड नुकसान झाले आहे. गेल्या वर्षीच्या निसर्ग चक्रीवादळामुळे आणि कोरोनामुळे आधीच कोकणचे आर्थिक नुकसान झाले होते. आता तौक्ते चक्रीवादळामुळे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे कोकणातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देताना नैसर्गिक आपत्तीचे नियम बाजूला ठेवून कोकणासाठी विशेष पॅकेज जाहीर करावे, अशी मागणीही दरेकर यांनी केली आहे.

तौक्ते चक्रीवादळाच्या रौद्ररुपामुळे अनेक ठिकाणी वीज वाहिन्या आणि विजेचे खांब कोसळले असून वीजपुरवठा खंडित झाला आहे. त्यामुळे सरकारने युद्धपातळीवर विजजोडणीचे काम करावे, असेही दरेकर यांनी म्हटले आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com