ऑक्सिजन आणि अग्निशामक विभागाचे ऑडिट होणार

राज्य सरकारने दिले आदेश
ऑक्सिजन आणि अग्निशामक विभागाचे ऑडिट होणार
USER

मुंबई | Mumbai

गेल्या दोन तीन दिवसांत झालेल्या घटनांमुळे राज्यातील सर्व रुग्णालयातील फायर आणि ऑक्सिजनचे ऑडिट होणार असल्याची घोषणा राज्य सरकारने केली आहे.

दरम्यान राज्यात करोनाचा प्रादुर्भाव दिवसागणिक वाढत असून ऑक्सिजनचा तुटवडाही रुग्णालयात भासत आहे. दरम्यान गेल्या काही दिवसांत राज्यातील अनेक रुग्णालयांत आगीच्या घटना ऐकायला मिळाल्या.

तसेच नाशिकच्या झाकीर हुसैन रुग्णालयातील ऑक्सिजन टँकर गळती घटनेने तर संपूर्ण महाराष्ट्र हादरला. यावर खबरदारीचा उपाय म्हणून आता राज्यातील सर्व रुग्णालयातील फायर आणि ऑक्सिजनचे ऑडिट होणार असल्याची घोषणा राज्य सरकारने केली आहे. यासंबंधीचे आदेश राज्य सरकारने दिले आहेत.

नाशिक रुग्णालय दुर्घटना आणि त्यानंतर आज घडलेली विरार रुग्णालयातील दुर्घटनेनंतर मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी ही माहिती दिली आहे. मुख्य सचिवांच्या झालेल्या व्हर्च्युअल मिटिंगमध्ये याबाबत निर्णय घेण्यात आला.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com