नगर जिल्ह्यातील करोनाची संख्या चिंताजनक : कठोर निर्बंध लागू करण्याच्या अजित पवार यांच्या सूचना

संगमनेर - पारनेरचे सर्वाधिक रुग्ण ससून रुग्णालयात
नगर जिल्ह्यातील करोनाची संख्या चिंताजनक : कठोर निर्बंध लागू करण्याच्या अजित पवार यांच्या सूचना

पुणे(प्रतिनिधि)

राज्यातील करोना परिस्थीती आटोक्यात येत असताना अहमदनगर जिह्यातील करोना रुग्णांची संख्या मात्र चिंताजनक आहे.

नगरमध्ये गावबंदी करायची असेल तरी करा, असे सांगतानाच नगरमध्ये रुग्ण नेमके कुठले आहेत ते तपासण्याचे आदेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले.पुण्यात कोरोना आढावा बैठकीत ते बोलत होते.

पुण्यातील ससून रुग्णालयात सर्वाधिक रूग्ण नगर जिल्ह्यातील आहेत. नगरचे जवळपास 40 टक्के रुग्ण आहेत. यात संगमनेर आणि पारनेर या दोन तालुक्यातील सर्वाधिक रूग्ण आहेत. याबाबत नाशिक आणि नगर येथील प्रशासकीय अधिकाऱयांसोबत चर्चा केली. त्यावेळी रूग्णांवर उपचार करण्याच्या सूचना अजित पवार यांनी दिल्या आहेत.

नगर जिल्ह्यातील करोनाची संख्या चिंताजनक : कठोर निर्बंध लागू करण्याच्या अजित पवार यांच्या सूचना
सर्वात लांबलेला मान्सून संपला, आता परतीचा प्रवास

अधिकाऱयांना चाचण्यांसाठी मदत हवी होती. नगर जिह्यात संगमनेर, पारनेरमध्ये रुग्णसंख्या वाढतेय. तिथे कठोर निर्बंध लागू करा आणि कोरोनाचा संसर्ग रोखा, असेही पवार यांनी यावेळी नमूद केले.

Related Stories

No stories found.