
मुंबई | Mumbai
ईडीने (ED) पुण्याचे बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले (Avinash Bhosale) यांना दणका दिला आहे. पुण्यातील (Pune) त्यांची मालमत्ता रिकामी करण्यासाठी नोटीस (Notice) बजावण्यात आली आहे....
ही मालमत्ता गेल्या वर्षी मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीने जप्त केली होती. एबीआयएलच्या भूखंडाचा ताबा घेण्यासाठी ही नोटीस पाठविण्यात आली आहे. या मालमत्तेची किंमत सुमारे चार कोटी ७३ लाख इतकी आहे.
अविनाश भोसले यांना येस बँक (YES Bank) आणि डीएचएफएलची (DHFL) फसवणूक केल्याप्रकरणी सीबीआयने (CBI) याआधीच अटक केली आहे. त्यांना मुंबईतील विशेष सीबीआय कोर्टाने ८ जूनपर्यंत सीबीआय कोठडी (CBI Custody) सुनावली आहे. सीबीआयच्या कारवाईपाठोपाठ ईडीने अविनाश भोसले यांना नोटीस बजावल्याने त्यांच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे.
अविनाश भोसले हे सुरुवातील रिक्षा चालक होते. भाड्याचे घरात राहून त्यांनी रिक्षा भाड्याने देण्यास सुरुवात केली. त्यानंतर भोसले यांचा एका बांधकाम व्यावसायिकाशी संबंध आला. नंतर ते स्वतः सरकारी कंत्राटदार बनले. पुण्यात त्यांची रिअल इस्टेट किंग अशी ओळख निर्माण झाली. एबीआयएल ग्रुपचे ते मालक आहेत.