'VI' चे नेटवर्क पुन्हा ढेपाळले

काही सर्कल मध्ये कनेक्टिव्हिटी फेल्युअरचा प्रॉब्लेम पुन्हा सुरू
'VI' चे नेटवर्क पुन्हा ढेपाळले

अहमदनगर | Ahmednagar

नुकत्याच एकत्र आलेल्या वोडाफोन-आयडियाचे मोबाईल नेटवर्क काही दिवसापूर्वी पूर्णपणे कोलमडले होते. आज देखील नाशिक, नगरसह काही सर्कलमध्ये तोच त्रास ग्राहकांना सहन करावा लागत आहे.

पुण्यात झालेल्या तांत्रिक बिघाडाने राज्याच्या निम्म्याहून जास्त सर्कलमध्ये ग्राहकांच्या connectivity failure त्रास सहन करावा लागला होता. पुण्यातील कल्याणीनगर येथील मुख्य कार्यालयात पाणी शिरल्याने सर्व्हर डाऊन झाल्याचे सांगितले गेले होते. ते सुरळीत होत नाही तोपर्यंत रविवारी पुन्हा नेटवर्क बंद झाले. नाशिक जिल्ह्यासह राज्यातील काही भागात नेटवर्क गेले. यासंदर्भात रविवारी कंपनीकडून कोणतीही अधिकृत माहिती दिली गेली नाही. नाशिक शहरातील कंपनीचा कर्मचाऱ्यांचे नंबरही बंद होते. तसेच यासंदर्भात टि्वट केल्यावरही कंपनीकडून काहीच उत्तर आले नाही.

सध्या राज्यातील विद्यापीठांच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा सुरू असून सोबत अनेक शाळांच्या अर्ध वार्षिक परीक्षा सुरू आहे. व्होडाफोनच्या नेटवर्क समस्येमुळे ऑनलाईन परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना अडचणी येत आहे.

काही ग्राहकांना कनेक्टिव्हिटी फेल्युअरचा त्रास सहन करावा लागत आहे. तर काही ग्राहकांचा कॉल ३०-४० सेकंदात कट होत आहे. काही ग्राहकांचे कॉल दुसऱ्याच ठिकाणी Divert होत आहे. ग्राहकांनी कंपनीच्या या ढिसाळ कारभारावर नाराजी व्यक्त केली आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com