नेट परीक्षाही पुढे ढकलली

एनटीएची घोषणा
नेट परीक्षाही पुढे ढकलली

नाशिक | Nashik

सहायक प्राध्यापकांसाठी अनिवार्य असलेली राष्ट्रीय पात्रता परीक्षा अर्थात 'नेट' परीक्षा देखील कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर स्थगित करण्यात आली आहे.

ही परीक्षा २ मे ते १७ मे दरम्यान देशभर होणार होती. केंद्रीय शिक्षण मंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी याबाबत एनटीएला परीक्षा स्थगित करण्याची विनंती केली होती.

नॅशनल टेस्टिंग एजन्सी (एनटीए) मार्फत देशभरात नेट परीक्षा घेतली जाते. प्राध्यापक होण्यासाठी ही परीक्षा महत्त्वाची असल्याने देशभरातील लाखो उमेदवार ही परीक्षा देतात.

ही परीक्षा कॉम्प्युटरवर आधारित ऑनलाइन पद्धतीने हाेते. तिच्या तारखा 'एनटीए'ने जाहीर केल्या हाेत्या. ८० विषयांसाठी नेट परीक्षा २ ते १७ मे या कालावधीत होणार होती.

या परीक्षेसाठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले. त्याची मुदतही संपली आहे. त्यामुळे 'एनटीए'कडून परीक्षेची तयारी सुरू हाेती. करोनाचा संसर्ग वाढल्याने महाराष्ट्रासह अनेक राज्यानी कठोर निर्बंध घातले आहेत.

महाराष्ट्र सरकारने एमपीएससी, वैद्यकीय परीक्षा आणि दहावीची परीक्षा रद्द, तर बारावी परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला. तर केंद्र सरकारने सीबीएसई, आयसीएसई, पदव्युत्तरच्या वैद्यकीय परीक्षा, जेईई मेन्स परीक्षा लांबणीवर टाकली आहे. मात्र नेट बद्दल निर्णय घेण्यात आलेला नव्हता. स्थिती गंभीर झाल्याने नेट परीक्षा पुढे ढकलावी अशी मागणी विद्यार्थ्यांकडून केली जात होती.

विद्यार्थ्यांच्या या मागणीनुसार पोखरियाल निशंक यांनी एटीएला तशी विनंतीही केली होती. त्यानुसार एनटीएकडून परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. नियोजिन तारीख १५ दिवस आधी कळवली जाईल, असे एनटीएने स्पष्ट केले आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com