पणजी -

गोव्यात आगामी विधानसभा निवडणूक स्वतंत्रपणे लढविण्याची राष्ट्रवादी काँग्रेसची तयारी नसल्याचे संकेत गोवा भेटीवर असलेले

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिले आहेत. इतर समविचारी पक्षांकडे निवडणूकपूर्व युतीचा पर्याय खुला असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

युतीबाबत बोलणी करण्याचे सर्वाधिकार प्रफुल्ल पटेल यांना देण्यात आलेले आहेत. तसेच सध्या पक्षाचे आमदार चर्चिल आलेमांव यांचा राज्यातील भाजपा सरकारला असलेला विषयाधारित पाठिंबा राज्याच्या हिताच्या दृष्टिकोनातूनच असल्याचे पवार यांनी स्पष्ट केले.

संसदेच्या संरक्षण समितीचे सदस्य या नात्याने शरद पवार हे सध्या गोवा दौर्यावर आहेत. बुधवारी राष्ट्रवादीच्या प्रदेश कार्यकारिणी बैठकीत त्यांनी संबोधित केले. त्यानंतर पत्रकार परिषदेत त्यांना 2022 च्या आगामी विधानसभा निवडणुकीसाठी पक्षाच्या धोरणाबद्दल विचारले असता शरद पवार म्हणाले की, पक्षाच्या स्थानिक नेत्यांमध्येही काँग्रेस तसेच इतर समविचारी व निधर्मी पक्षांकडे युती व्हावी अशी इच्छा आहे. युतीचा निर्णय पक्षाच्या केंद्रीय स्तरावर घेतला जाईल. पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस प्रफुल्ल पटेल हे युतीसाठी बोलणी करतील. निवडणुकीच्या किमान सहा महिने आधी युतीच्याबाबतीत निर्णय जाहीर होईल.