पुढील 4 दिवसांत 'या' भागात मुसळधार पावसाची शक्यता

पुढील 4 दिवसांत 'या' भागात मुसळधार पावसाची शक्यता

मुंबई | Mumbai

जूनच्या सुरुवातीला दाखल झालेल्या मान्सूनने बराच काळ विश्रांती घेतली. त्यानंतर 8 जुलैपासून मान्सून (Monsoon) पुन्हा सक्रीय झाला आहे. त्यामुळे आजपासून पुढील 4 दिवस मुंबई (Mumbai), ठाणे (Thane), पालघर (Palghar) भागांत मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे...

दि. 12 ते 14 जुलै दरम्यान देखील मुंबईत मुसळधार पावसाची शक्यता असून अंतर्गत भागांत अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे.

मुंबई, ठाणे, पालघरसाठी हवामान खात्याने (Meteorological Department) येल्लो अलर्ट (Yellow alert) जारी केला आहे. दरम्यान, बंगालच्या उपसागरात पश्चिम मध्य आणि उत्तर पश्चिम भागात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने पावसाची परिस्थिती निर्माण झाली आहे. कालदेखील ठाणे, डोंबिवली, कल्याण या भागांत हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस झाला.

त्याचबरोबर रत्नागिरी (Ratnagiri) आणि सिंधुदुर्गमध्येही (Sindhudurg) काही ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. तसेच पुणे, सातारा आणि कोल्हापूर या जिल्ह्य़ांतील घाट विभागांमध्ये चार दिवस जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असून मराठवाडा आणि विदर्भातही मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता असल्याचे हवामान खात्याकडून सांगण्यात आले आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com