हाय रे गरमी! उष्णतेची लाट कायम राहणार

हाय रे गरमी! उष्णतेची लाट कायम राहणार

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

उष्णतेची लाट (Heat Wave) ही शनिवार दि. २ एप्रिलपर्यंत कायम राहणार आहे. उष्णतेची लाट ही कमी कालावधीसाठी जरी असली तरी तिचे अस्तित्व वातावरणानुसार कमी अधिक होऊन वारंवार ती पुन्हा येते, असे हवामान तज्ञ माणिकराव खुळे (Manikrao Khule) यांनी सांगितले आहे....

या सप्ताहाच्या सुरुवातीपासूनच कोकण व दक्षिण मध्य महाराष्ट्रातील जिल्हे वगळता महाराष्ट्रातील (Maharashtra) कमाल तापमान (Maximum temperature) हे सरासरीपेक्षा २ ते ४ डिग्रीने अधिक म्हणजे ३९ ते ४३ डिग्री पर्यंत होते. अतिनील किरणांचे ए, बी, सी, असे ३ बँड प्रकार असून पहिले २ घातक नाही.

ते ओझोनच्या (Ozone) थरातून सहज पास होतात. पण जेव्हा उष्णतेची (Heat) तीव्रता अधिक असते तेव्हा सी बँडमधील १०० ते २८० नॅनोमिटर लहरलांबी कक्षेतील किरणे मात्र ओझोन थरात अटकाव न होता वेगाने घुसतात व मानवी शरीरावर आदळतात.

त्यामुळे प्रत्येक व्यक्तीने आपले शारीरिक संरक्षण केल्यास १) प्रतिकार शक्ती कमी होणे, २) डोळ्याचा मोतीबिंदू व इतर घातक परिणाम होणे, ३) त्वचेवर सुरकुत्या, त्वचा अकाली वृद्धत्व, त्वचा घातक परिणाम तसेच त्वचा कॅन्सर ('मेला' व नॉनमेलानोमा) पासून बचाव होऊ शकतो.

उष्ण लाटेमुळे जी भिती आज वाटते, भविष्यात जागतिक पातळीवर चिलिंग प्लॅन्ट, भव्य कोल्ड स्टोरेज, घरगुती रेफ्रिजरेशन यातून उत्सर्जित होणाऱ्या क्लोरो-फ्लूरोकार्बनचा अटकाव न केल्यास शेकडो हजारो वर्षानंतर ओझोन थर अति विरळ होऊन समृद्राच्या पाणी पातळीत वाढ, बर्फ वितळणी, सजीव सृष्टी हानी, असाध्य अशा रोगांचा प्रादुर्भाव आदी समस्यांना तोंड द्यावे लागेल, असेदेखील खुळे यांनी सांगितले आहे.

Related Stories

No stories found.