तिसऱ्या लाटेसाठी आरोग्य विभाग सज्ज

तिसऱ्या लाटेसाठी आरोग्य विभाग सज्ज

मुंबई | प्रतिनिधी | Mumbai
करोनाच्या तिसऱ्या लाटेची (Corona Third Wave) शक्यता गृहीत धरून सार्वजनिक आरोग्य विभागाने (Health Department) आतापासूनच सज्जता ठेवली आहे...

ऐनवेळी सोयी सुविधांची कमतरता भासू नये यासाठी आरोग्य विभाग जवळपास ५५० कोटी रुपयांची औषधे आणि करोना साहित्याची खरेदी करणार आहे. यात रेमडिसेव्हिर (Remedisevir), टॉसिलिझुमाब (tocilizumab) या इंजेक्शनसह विविध प्रकारची औषधे () तसेच मास्क, पीपीई किट यांचा समावेश आहे.

राज्यात ऑक्टोबर महिन्यात तिसरी लाट येणार असल्याची शक्यता तज्ज्ञांकडून वर्तवली जात आहे. नीती आयोगानेही देशात करोनाची तिसरी लाट मोठी असेल असा इशारा दिला आहे. तिसऱ्या लाटेत करोनाच्या नवीन रुग्णांची संख्या ४ ते ५ लाखांपर्यंत आढळून येऊ शकते. यामुळे अशा परिस्थितीत आपल्याला किमान २ लाख आयसीयू बेड्सची व्यवस्था करण्याची आवश्यकता असल्याचे नीती आयोगाने केंद्र सरकारला कळवले आहे.

या पार्श्वभूमीवर करोनाच्या तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी आरोग्य विभाग ५५० कोटी रुपयांची खरेदी करणार असून त्यासंदर्भात विभागाने आदेश काढला आहे. पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत रेमडिसिव्हिर आणि टॉसिलिझुमाब या इंजेक्शनचा तुटवडा न होता.

ही इंजेक्शन्स खरेदी करण्यासाठी लोकांचे अतोनात हाल झाले होते. हे लक्षात घेता आवश्यक असलेली ही सर्व इंजेक्शन्स तिसऱ्या लाटेपूर्वीच खरेदी केली जाणार आहेत.

आरोग्य विभागाची खरेदी
आरोग्य विभागाकडून २ लाख ५० हजार रेमडिसेव्हिर इंजेक्शन, १० हजार टॉसिलिझुमाब इंजेक्शन्स, १ कोटी ५० लाख पॅरॅसिटॉमल गोळ्या, ५० हजार ऑक्सिजन मास्क, ३ कोटी आरटीपीसीआर टेस्ट किट, ८७ लाख ५० हजार रॅपिड अँटिजन टेस्ट किट, १ कोटी ५० लाख ट्रिपल लेअर मास्क, १ कोटी ३२ लाख एन ९५ मास्क, १ कोटी ३२ लाख ५० हजार पीपीई किट आणि करोना रुग्णांचे मृतदेह ठेवण्यासाठीचे विशिष्ट प्रकारचे १ लाख २५ हजार सूट खरेदी केले जाणार आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com