मुख्यमंत्री उध्दव ठाकरे
मुख्यमंत्री उध्दव ठाकरे
महाराष्ट्र

राजगृहाचा अवमान करणाऱ्यांची सरकार गय करणार नाही - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

कडक कारवाईचे आदेश मी पोलीसांना दिले आहेत.

Nilesh Jadhav

मुंबई | प्रतिनिधी | मुंबई

काल मुंबईतील झालेल्या घटनेवर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

ते म्हणाले, "राजगृहाच्या आवारात घुसून काही गुंडांनी धुडगूस घातला हे धक्कादायक आहे. ही वास्तू फक्त आंबेडकरी जनतेची नाही तर संपूर्ण समजाचे श्रद्धास्थान आहे. आपला ग्रंथखजीना डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांनी या वास्तुत जपून ठेवला. महाराष्ट्रातील तमाम जनतेचे हे तीर्थक्षेत्रच आहे. राजगृहाचा अवमान करणाऱ्यांची सरकार गय करणार नाही. कडक कारवाईचे आदेश मी पोलीसांना दिले आहेत." अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी दिली आहे.

Deshdoot Digital Dhamaka | देशदूत डिजिटल धमाका
www.deshdoot.com