आठवडे बाजार, यात्रा सुरु करण्याबाबत सकारात्मक
सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख

आठवडे बाजार, यात्रा सुरु करण्याबाबत सकारात्मक

मुंबई | प्रतिनिधी | Mumbai

गेल्या दीड वर्षांपासून राज्यात करोनामुळे (Corona) सांस्कृतिक कार्यक्रमांना बंदी घालण्यात आली असून अजूनही करोनाच्या तिसऱ्या लाटेचा (Corona Third Wave) संभाव्य धोका आहे...

करोनाचे संकट पूर्णपणे टळलेले नसल्याने राज्यातील निर्बंध टप्प्याटप्प्याने शिथिल करण्यात येत आहेत. त्यामुळे राज्यात कलाकेंद्र, आठवडे बाजार आणि यात्रा लवकर सुरु करण्याबाबत राज्य सरकार सकारात्मक असल्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख (Amit Deshmukh) यांनी सांगितले.

अखिल महाराष्ट्र संगीत पार्टी तमाशा कलावंत महासंघाचे अध्यक्ष अरुण मुसळे (Arun Musle) यांच्यासह शिष्टमंडळाने अमित देशमुख यांची मंत्रालयात भेट घेऊन त्यांना महासंघाचे निवेदन दिले.

त्यावेळी बोलताना देशमुख यांनी राज्यातील तमाशा, लावणी आणि लोक कलावंतांच्या अडचणी सोडविण्यासाठी सरकार सकारात्मक आहे. निर्बंध जरी शिथिल करण्यात आले असले तरी धोका पूर्णपणे टळलेला नसल्याने टप्प्याटप्प्याने अनलॉक (Unlock) प्रक्रिया करण्यात येत असल्याची माहिती दिली.

लोककलावंतांसाठी आर्थिक विकास महामंडळ स्थापन करणे, अधिवेशनाच्या काळात पारंपारिक लावणी कलावंतांचा राज्यस्तरीय लावणी महोत्सव आयोजित करणे, वृध्द कलावंतांच्या मानधनामध्ये वाढ मिळावी,

राज्यातील पारंपारिक लावणी आणि तमाशा कलावंतांच्या घरसंकुलासाठी पुणे येथे पाच एकर जागा मिळावी, सांस्कृतिक कार्य विभागामार्फत असणाऱ्या समितीवर लावणी, तमाशा आणि लोककलावंतांना प्रतिनिधित्व मिळावे, आदी मागण्या शिष्टमंडळाने अमित देशमुख यांच्याकडे मांडल्या.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com