खासगी शाळांच्या फीबाबत सरकार निर्णय घेऊ शकत नाही

शिक्षण संस्थांची न्यायालयात याचिका, सुनावणी दिवाळीनंतर
खासगी शाळांच्या फीबाबत सरकार निर्णय घेऊ शकत नाही

मुंबई -

करोना संक्रमणाच्या काळात प्रमाणे रुग्णालयातील उपचारांचे दर हे राज्य सरकारकडून ठरवण्यात आलेले नव्हते, ज्याप्रमाणे खाजगी शाळांच्या फी वाढी

संदर्भात सरकार हस्तक्षेप करू शकत नाही, असा दावा याचिकाकर्त्यां शिक्षण संस्थांनी उच्च न्यायालयात केला आहे.

खासगी शाळांच्या फी वाढीसंदर्भात मुंबई उच्च न्यायालयात, खासगी शैक्षणिक संस्थांकडून दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर सध्या सुनावणी सुरू आहे. ही सुनावणी मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती दिपांकर दत्ता व न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठासमोर करण्यात येत आहे.

याचिकाकर्त्यांनी सादर केलेल्या तपशिलाचा आढावा घेतल्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाने यासंदभार्तील सुनावणी ही 25 नोव्हेंबरपर्यंत तहकूब केलेली आहे. या संदभार्तील पुढील सुनावणी ही दिवाळीनंतर घेण्यात येईल, असे न्यायालयाने स्पष्ट केलेले आहे.

या अगोदर झालेल्या सुनावणी दरम्यान मुंबई उच्च न्यायालयाने खासगी शाळांकडून मागील काळामध्ये कशा प्रकारे फी वाढ करण्यात आली होती व ती किती करण्यात आली होती या संबंधीचा तपशील सादर करण्याचे आदेश देण्यात आले होते. त्याप्रमाणे मुंबईतील

कासेगाव एज्युकेशन ट्रस्ट, असोसिएशन -फ इंडियन स्कूल, एज्युकेशन फाउंडेशन व ज्ञानेश्वर माऊली संस्था या शैक्षणिक संस्थांकडून मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार फी वाढीसंदभार्तील तपशील सादर करण्यात आलेला होता.

हा तपशील सादर केल्यानंतर या याचिकाकर्त्यांनी फी वाढीसंदर्भात सरकारचा हस्तक्षेप हात केला जाऊ शकत नसल्याचा दावा केला आहे. कोरोना संक्रमणाच्या काळात ज्या प्रकारे रुग्णालयातील उपचारांचे दर हे राज्य सरकारकडून ठरवण्यात आलेले नव्हते, त्याचप्रमाणे खासगी शाळांच्या फी वाढी संदर्भात सरकार हस्तक्षेप करू शकत नाही, असा दावा याचिकाकर्त्यांनी केला आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com