कृती दलाशी चर्चा करूनच शाळांचा निर्णय

उपमुख्यमंत्री अजित पवार
कृती दलाशी चर्चा करूनच शाळांचा निर्णय

मुंबई । प्रतिनिधी Mumbai

राज्यातील शाळा सुरू करण्याबाबतचा अंतिम निर्णय ( Decision to start schools in the state )मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ( Chief Minister Uddhav Thackeray ) हे कृती दलाशी (Task Force ) चर्चा करुन घेणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार (Deputy Chief Minister Ajit Pawar ) यांनी गुरुवारी दिली.

दरम्यान, राज्यातील सर्व शाळांमधील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे लसीचे दोन डोस पूर्ण करावेत असा निर्णय झाला असून तशा सूचना देण्यात आल्याचेही पवार यांनी आज माध्यमांशी बोलताना सांगितले. आपला पाल्य ज्या शाळेत जातोय त्या शिक्षकांचे लसीचे दोन डोस पूर्ण झाल्यास पालकांना दिलासा मिळेल, असेही पवार म्हणाले.

केंद्र सरकारकडून गर्दी करणारे उत्सव घरगुती पध्दतीने साजरे करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. काही राज्यात शाळा सुरू करण्यात आल्या. मात्र काही दिवसातच विद्यार्थी करोना पॉझिटिव्ह सापडले होते.

शिवाय तिसर्‍या लाटेत सर्वाधिक रुग्ण केरळ राज्यात आणि दुसरा क्रमांक हा महाराष्ट्राचा लागत आहे. त्यामुळे केंद्र सरकारच्या आरोग्य विभागाने राज्याला काही सूचना केल्याचे पवार यांनी स्पष्ट केले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com