मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांना भेटण्यापूर्वी निर्णय घ्यायला हवे होते - विनायक मेटे

मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांना भेटण्यापूर्वी निर्णय घ्यायला हवे होते - विनायक मेटे
विनायक मेटे

मुंबई - पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेण्यापूर्वी मुख्यमंत्र्यांनी आपल्या आखत्यारितीत काही निर्णय घेण्याची आवश्यकता होती. तसेच मुख्यमंत्री पंतप्रधान मोदी यांच्याशी काय चर्चा करणार? कोणत्या प्रश्‍नांवर चर्चा करणार? याविषयी जनतेला समजायला हवे होते असे शिवसंग्राम संघटनेचे नेते विनायक मेटे यांनी म्हटले आहे.

मुख्यमंत्र्यांनी मोदींची भेट घेण्यापूर्वी मराठा तरुणांची प्रलंबित नियुक्ती मार्ग लावले पाहिजे होती, मराठा आरक्षणासाठी सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल करायला हवी होती. ओबीसी समाजाप्रमाणे मराठ्यांना सोयी द्यायला पाहिजे होत्या या सर्व हातातील गोष्टी राज्य सरकारने न करता पंतप्रधानांची भेट घेण्यास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जात असल्याचे विनायक मेटे यांनी म्हटले आहे.

दरम्यान, मराठा आरक्षणासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, मुख्य सचिव आणि काँग्रेस, राष्ट्रवादीच्या नेत्यांसह दिल्लीला जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेणार आहेत. या भेटीमध्ये मराठा आरक्षणाच्या प्रश्‍नांवर सखोल चर्चा होणार आहे. परंतु मुख्यमंत्र्यांच्या भेटीवरुन भाजप नेत्यांनी निशाणा साधला आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com