बनावट प्रमाणपत्र रोखण्यासाठी ब्लॉकचेन तंत्रज्ञानाचा आधार

- कौशल्य विकास मंत्री नवाब मलिक यांची माहिती
बनावट प्रमाणपत्र रोखण्यासाठी ब्लॉकचेन तंत्रज्ञानाचा आधार

मुंबई । प्रतिनिधी Mumbai

बनावट शैक्षणिक प्रमाणपत्रे ( Fake academic certificates ) रोखण्यासाठी महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास मंडळा ( Maharashtra State Skill Development Board )ने पुढाकार घेतला असून ब्लॉकचेन तंत्रज्ञानाच्या आधारे मंडळाकडील एकूण आठ शैक्षणिक वर्षातील सुमारे १० लाख डिजिटल डिप्लोमा प्रमाणपत्रे जारी करण्यात येत आहेत, अशी माहिती विभागाचे मंत्री नवाब मलिक ( Skills Development Minister Nawab Malik) यांनी रविवारी दिली.

यामुळे बनावट शैक्षणिक प्रमाणपत्रांना पायबंद घातला जाणार असून उद्योगांना उमेदवारांच्या प्रमाणपत्रांची सत्यता पडताळणी करणे सुलभ होणार आहे. शिवाय योग्य उमेदवारांची होणारी गैरसोय रोखली जाणार आहे, असेही त्यांनी सांगितले.

बनावट प्रमाणापत्र रोखण्यासाठी क्रॉसफोर्स सोल्यूशन्स प्रायव्हेट लिमिटेडद्वारा विकसित लेजीटडॉक हे इथरियम ब्लॉकचेन तंत्रज्ञान वापरण्यात येणार असून या प्रणालीच्या मदतीने बनावटरहीत डिजिटल कागदपत्रे १० सेकंदात जगभरातून कोठूनही ऑनलाईन पडताळणी करता येऊ शकतील.

महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटीमार्फत घेण्यात आलेल्या स्टार्टअप मेळाव्यातून ही संकल्पना पुढे आली असून महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास मंडळामार्फत याची अंमलबजावणी करण्यात येत आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com