अल्पवयीन मुलीनेच रचला स्वत:च्या अपहरणाचा बनाव

कुटुंबियांकडेच मागीतली पाच लाखांची खंडणी
अल्पवयीन मुलीनेच रचला स्वत:च्या अपहरणाचा बनाव

पुणे |प्रतिनिधी| Pune

पुणे जिल्ह्यातील शिक्रापूर येथील एका अल्पवयीन मुलीने स्वत:च्या अपहरणाचा बनाव रचून कुटुंबियांकडेच पाच लाखांची खंडणी मागितल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. या मुलीला बिहार मधील छापरा येथून पोलिसानी ताब्यात घेऊन तिला तिच्या कुटुंबियांकडे सुपूर्द करण्यात आले आहे. दरम्यान, या मुलीने हे कृत्य का आणि कशासाठी केलं याबाबत अद्याप माहिती समोर आलेली नाही.

संबंधित पंधरा वर्षीय अल्पवयीन मुलगी कुणालाही न सांगता घरातून निघून गेली होती. मुलगी घरी नसल्याचे लक्षात येताच कुटुंबीयांनी शोधाशोध करण्यास सुरुवात केली. मुलीचा शोध सुरु असतानाच मुलीच्या भावाच्या मोबाईलवरती मेसेज आला. या मेसेजमध्ये ‘पाच लाख रुपये, नाहीतर तिचे जीवाचे काही खरे नाही” असे लिहण्यात आले होते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे हा मेसेज मुलीच्या मोबाईलवरून आला होता.

खंडणीचा मेसेज पाहताच मुलीच्या आईने शिक्रापूर पोलिसात धाव घेऊन तक्रार दाखल केली. तसेच घडलेली सर्व माहिती पोलिसांना सांगितली. तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तांत्रिक विश्लेषणाद्वारे तपास करण्यास सुरुवात केली. ज्या मोबाईलवरून मेसेज आला होता. त्या नंबरवरून लोकेशनचा तपासत असताना संबंधित मुलगी पुणे ते छापरा या रेल्वेने जात असल्याची माहीती मिळाली. याचा माहितीच्या आधारे पोलिसांनी अधिक वेगाने चक्रे हालवली , त्यासाठी बिहार राज्यातील छापरा रेल्वे पोलिसांची मदत घेण्यात आली. त्यानंतर छापरा रेल्वे पोलिसांना मुलीला ताब्यात घेण्यास सांगितले.

शिक्रापूर पोलिसांच्या मार्गदर्शनाखाली आरोपी अल्पवयीन मुलीची ओळख पटवत छापरा रेल्वे पोलिसांनी तिला ताब्यात घेतले. त्यानंतर शिक्रमापूर पोलिसांनी मुलीला आपाल्या ताब्यात घेतले. त्यानंतर शिक्रापूर पोलिसांनी मुलीकड चौकशी केली असता धक्कादायक माहिती समोर आली. मोबाईलवरून पाच लाख खंडणीचा मेसेज स्वतः मुलीन पाठवला असल्याचं सांगितलं. इतकंच नव्हे तर खंडणीचा बनावही तिनेच रचल्याची माहिती दिली.मुलीन हे सगळं का केलं याच उत्तर मात्र आद्यपही समोर आलेले नाही. चौकशीनंतर पोलिसांनी मुलीला कुटुंबियांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com