Sushma Andhare : "ड्रग्ज माफिया ललित पाटीलला ससूनमध्ये दाखल करण्यासाठी दादा भुसेंचा फोन"; ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारेंचा गंभीर आरोप

Sushma Andhare : "ड्रग्ज माफिया ललित पाटीलला ससूनमध्ये दाखल करण्यासाठी दादा भुसेंचा फोन"; ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारेंचा गंभीर आरोप

मुंबई | Mumbai

मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) चार दिवसांपूर्वी नाशिक शहराजवळील (Nashik City) शिंदे गावात एका पत्र्याच्या शेडमध्ये छापा (Raid) टाकून ड्रग्जचा कारखाना उध्वस्त केला होता. त्यानंतर नाशिक पोलिसांनी धाड टाकली असता कोटी रुपयांचा ऐवज जप्त केला होता. या दोन्ही कारवाईत पोलिसांनी जवळपास ५ कोटी रुपयांची ४ किलो ७८० ग्रॅम एमडी ड्रग्स पावडर आणि कच्चा माल हस्तगत केला होता. तर नाशिक येथील कारखाना चालविणारा भूषण पाटील हा फरार झाला होता. त्यानंतर पोलिसांनी त्याच्या शोधासाठी विविध पथके रवाना केली होती. तसेच भूषण पाटील याचा भाऊ ड्रग्ज माफिया ललित पाटील (lalit Patil) हा पुण्यातील ससून रुग्णालयाच्या परिसरात ड्रग्ज सापडल्याने पळून गेला होता.

Sushma Andhare : "ड्रग्ज माफिया ललित पाटीलला ससूनमध्ये दाखल करण्यासाठी दादा भुसेंचा फोन"; ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारेंचा गंभीर आरोप
पोलिसांची मोठी कारवाई! ड्रग्ज माफिया भूषण पाटीलसह साथीदाराला वाराणसीतून अटक

त्यानंतर पोलिसांकडून त्यांचा शोध घेण्यात येत होता. यानंतर आज पुणे पोलिसांनी नाशिकमधून फरार झालेला भूषण पाटील (Bhushan Patil) आणि त्याचा साथीदार अभिषेक बलकवडे याला मोठ्या शिताफीने उत्तर प्रदेशातील वाराणसी येथून ताब्यात घेतले आहे. त्यामुळे आता ललित पाटीलही लवकरच पोलिसांच्या हाती लागू शकतो. अशातच आता फरारी ड्रग्ज माफिया ललित पाटील याला ससूनमध्ये दाखल करण्यासाठी राज्याचे मंत्री दादा भुसे (Dada Bhuse) यांचा फोन गेला होता, त्यांचे कॉल रेकॉर्ड तपास असा आरोप ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी केला आहे. त्यामुळे आता ड्रग्ज प्रकरणावरून आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत.

Sushma Andhare : "ड्रग्ज माफिया ललित पाटीलला ससूनमध्ये दाखल करण्यासाठी दादा भुसेंचा फोन"; ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारेंचा गंभीर आरोप
Uddhav Thackeray : शिंदेंच्या शिवसेनेने शिवाजी पार्कमध्ये दसरा मेळाव्यासाठी अर्ज मागे घेतल्यानंतर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

यावेळी बोलतांना सुषमा अंधारे म्हणाल्या की, "काल नाना पटोले यांनी पत्रकार परिषद घेतली तसेच काँग्रेसचे आमदार रविंद्र धंगेकर यांनी देखील सकाळी सांगितले की या प्रकरणात शिंदे गटाच्या आमदाराचा हात आहे. म्हणजेच याची माहिती सर्वांना आहे पण नाव कोणी घेतले नव्हते पण मी थेट नाव घेताना सांगते की, या प्रकरणात दादा भुसे यांच्या नावाभोवती संशयाचे धुकं असेल तर त्यांचे कॉल रेकॉर्ड का चेक केले जाऊ नयेत? त्यांना प्रश्न का विचारले जाऊ नयेत? जर गृहखात्याची खरंच इच्छाशक्ती असेल की या प्रकरणाचा छडा लावायचा तर त्यांनी हा विषय स्पष्ट करायला हवा," असे त्यांनी म्हटले.

Sushma Andhare : "ड्रग्ज माफिया ललित पाटीलला ससूनमध्ये दाखल करण्यासाठी दादा भुसेंचा फोन"; ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारेंचा गंभीर आरोप
महायुती सरकारचा विधीमंडळ समित्यांचा फॉर्म्युला ठरला! भाजप मोठा भाऊ पण चलती मात्र लहान भावांची

दरम्यान, याआधी आज पुण्यातील कॉंग्रसचे आमदार रविंद्र धंगेकरांनी (MLA Ravindra Dhangekar) पत्रकार परिषद घेत ड्रग्ज माफिया ललित पाटील पळून जाण्यात शिंदे गटातील एका मंत्र्याचा हात आहे. मात्र यावेळी त्यांनी कोणत्याही मंत्र्याचे नाव घेतले नव्हते. पंरतु, ठाकरे गटाच्या फायरब्रँड नेत्या सुषमा अंधारे यांनी आता थेट मंत्री दादा भुसे यांचे नाव घेतल्याने याप्रकरणाला नवे वळण मिळाले आहे. तर दुसरीकडे ललित पाटील फरार होऊन नऊ दिवस झाल्यानंतर देखील त्याच्यावर कुठल्या आजारासाठी उपचार सुरु होते आणि त्याच्यावर कोण डॉक्टर उपचार करत होते? हे ससून रूग्णालयाकडून (Sassoon Hospital) जाहीर करण्यात आलेले नाही. त्यामुळे ससूनच्या कारभारावर प्रश्न चिन्ह उपस्थित केला जात आहे.

'देशदूत' / 'सार्वमत'चे व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Sushma Andhare : "ड्रग्ज माफिया ललित पाटीलला ससूनमध्ये दाखल करण्यासाठी दादा भुसेंचा फोन"; ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारेंचा गंभीर आरोप
Shivsena Dasara Melava : यंदाही शिवाजी पार्कवर ठाकरेंचाच आवाज घुमणार; शिंदेंच्या शिवसेनेची माघार, केसरकरांनी सांगितलं कारण

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com