
मुंबई | प्रतिनिधी | Mumbai
पेपरफुटी आणि अनेकविध घोळांमुळे गेली तीन वर्ष रखडलेल्या सार्वजनिक आरोग्य विभागाची भरती प्रक्रिया आता पुन्हा सुरु होणार आहे. या भरती प्रक्रियेच्या माध्यमातून १० हजार ९४९ पदे भरली जाणार आहेत. ही संपूर्ण भरती प्रक्रिया टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस अर्थात TCS मार्फत राबवली जाईल, अशी माहिती सार्वजनिक आरोग्यमंत्री तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांनी सोमवारी येथे दिली...
महाविकास आघाडी सरकारच्या काळात २०२१ मध्ये आरोग्य विभागात राबवण्यात आलेल्या भरती प्रक्रियेवेळी पेपरफुटीचा घोटाळा झाला होता. त्यानंतर ही भरती प्रक्रिया थांबली होती. आता तानाजी सावंत यांनी या भरतीसाठी पुढाकार घेतला असून त्यांच्या पाठपुराव्यानंतर आरोग्य विभागातील मेगा भरती प्रक्रिया सुरू होणार आहे. या भरती प्रक्रियेत ‘क’ आणि ‘ड’ संवर्गातील विविध ६० प्रकारची पदे मिळून एकूण १० हजार ९४९ पदांची केली जाणार आहे.