मुंबई -

ब्रिटनसह जगातील इतर देशांमध्ये आढळून आलेल्या करोना विषाणूचा नवा प्रकार अर्थात स्ट्रेन हा आधीच्या करोनापेक्षा अधिक संसर्गजन्य आहे. या नव्या विषाणूला

गांभीर्याने घ्यायला हवे, सतर्क रहा असे आवाहन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केले आहे. या विषाणूचा नवा अवतार अधिक संसर्गजन्य असला तरी आपण सध्या देत असलेली औषधं आणि निर्माण होत असलेल्या कोरोना लस या त्या विषाणूवर परिणामकारक असल्याचा दावाही आरोग्यमंत्री टोपे यांनी केला आहे.

दरम्यान, केंद्र सरकारकडून देण्यात आलेल्या कार्यक्रमानुसार राज्य सरकारकडून लसीकरणाचे प्रशिक्षण पूर्ण झाले असल्याचे देखील आरोग्यमंत्री म्हणाले. त्याचबरोबर शीतगृहांच्या कमतरतेबाबत केंद्राला कळवण्यात आले असून, केंद्राकडून त्याबाबत आश्वासन देण्यात आले आहे. आपल्याला नागरिकांना दोन वेळा लस द्यावी लागणार आहे. त्यामुळे लसीकरणाबाबत राज्य सरकारने मायक्रो प्लॅनिंग केल्याचेही आरोग्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.