
मुंबई | Mumbai
एकीकडे करोना (Corona) पुन्हा डोके वर काढत आहे तर दुसरीकडे महाराष्ट्रात (Maharashtra) स्वाइन फ्लूचा (Swine Flu) प्रसार आता वेगाने होत आहे. आतापर्यंत राज्यात १४२ रुग्णांना स्वाईन फ्लूची लागण झाली आहे. नाशकात (Nashik) स्वाइन फ्लूचे एकूण १७ रुग्ण आढळून आले आहेत...
महाराष्ट्रात ८ जूनपर्यंत एकूण ८ जणांना स्वाइन फ्लूची (Swine Flu) लागण झाली होती, तर शून्य मृत्यूची नोंद होती. मात्र आता आजाराचा संसर्ग वाढू लागला आहे.
गेल्या दहा दिवसांत स्वाइन फ्लूचे १२६ रुग्ण आढळून आले आहेत. आतापर्यंत स्वाईन फ्लूमुळे ७ जणांचा मृत्यू झाला. कोल्हापुरात (Kolhapur) तीन, पुण्यात (Pune) दोन आणि ठाण्यात (Thane) दोन रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सध्या मुंबईत (Mumbai) स्वाइन फ्लूचे ४३ रुग्ण आहेत. पालघरमध्ये (Palghar) २२ तर पुण्यात (Pune) २३ रुग्ण आहेत. नाशिकमध्ये (Nashik) स्वाइन फ्लूचे १७ रुग्ण असून नागपूरमध्ये (Nagpur) १४ रुग्ण आढळले आहेत.
कोल्हापूरमध्येही (Kolhapur) 14 रुग्णांची नोंद करण्यात आली असून ठाण्यात ७ रुग्ण आहेत. कल्याण-डोंबिवलीत (Kalyan-Dombivli) दोन रुग्ण आढळले आहेत.
दरम्यान, या या आजाराच्या नियंत्रणासाठी सर्वेक्षण, प्रतिबंध व आवश्यक उपाययोजना करण्यात येत आहेत, असे आरोग्य विभागाने सांगितले.