पुणे रेल्वे स्थानकात आढळलेल्या 'त्या' संशयास्पद वस्तुबाबत पोलिसांचा मोठा खुलासा

पुणे रेल्वे स्थानकात आढळलेल्या 'त्या' संशयास्पद वस्तुबाबत पोलिसांचा मोठा खुलासा

पुणे

पुणे रेल्वे स्थानकात आज सकाळी बॉम्ब सदृश वस्तु आढळून आल्याने एकच खळबळ उडाली होती मात्र, ही वस्तु बॉम्ब नसल्याचे स्पष्ट झाले आहे. ज्या वस्तू मिळाल्या आहेत, त्यांची तपासणी सुरु आहे. यामध्ये कोणतेही सर्किट किंवा स्फोटक घटक आढळून आलेले नाहीत. रेल्वे पोलीस आणि पुणे पोलिसांकडून याचा समांतररित्या तपास केला जाईल, अशी माहिती पुण्याचे पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी दिली.

आज सकाळी साडेदहाच्या सुमारास पुणे रेल्वे स्थानकात बॉम्ब सदृश वस्तु आढळून आली होती. ही माहिती मिळताच पोलिस आणि बॉम्ब शोधक पथक स्थानकावर तत्काळ दाखल झाले. पोलिसांनी पुणे रेल्वे स्थानक पूर्ण रिकामे केले होते, तसेच पुण्याकडे येणाऱ्या सर्व रेल्वे गाड्याही थांबविण्यात आल्या होत्या. दरम्यान, प्रथमदर्शनी तरी या वस्तू जिलेटीन असल्याचे वाटत नाही. पण बॉम्बशोधक पथकाकडून या वस्तूंची तपासणी सुरु असल्याचे पुण्याचे पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी सांगितले. या घटनेनंतर पुणे पोलीस स्थानकाच्या परिसरातील पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.

पुणे रेल्वे स्थानकात आढळलेल्या 'त्या' संशयास्पद वस्तुबाबत पोलिसांचा मोठा खुलासा
पांढरी साडी अन् साधा भोळा अंदाज, पाहा 'आर्ची'चे खास फोटो

पुणे स्थानकावर शुक्रवारी नेहमी प्रमाणे वर्दळ असतांना बॉम्बसदृष्य वस्तू सापडल्याची माहिती पोलिसांना मिळाली. ही बॉम्ब सदृष्य वस्तू फटाक्यासारखी आहे अशी प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली आहे. दरम्यान, ही वस्तू स्थानकावर कुणी आणली ? या मागे काही घातपात करण्याचा हेतू होता का ? या प्रश्नांचा शोध घेतला जात आहे. दरम्यान बॉम्ब शोधक पथकाने स्थानकाच्या गेट समोरील एक फटाका सदृष्यवस्तू निकामी केली आहे.

तब्बल तासाभराच्या तपासणीनंतर रेल्वे स्थानकावर सापडलेल्या या वस्तू बॉम्ब नसल्याचे स्पष्ट झाले. पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी याबद्दल माहिती देताना सांगितले की, पुणे रेल्वे स्थानकावर कोणताही बॉम्ब किंवा स्फोटके आढळलेली नाहीत. फलाट क्रमांक १ आणि २ पुन्हा एकदा रहदारीसाठी खुले करण्यात आले असून रेल्वे वाहतूकही पूर्ववत सुरु झाली आहे.

पुणे रेल्वे स्थानकात आढळलेल्या 'त्या' संशयास्पद वस्तुबाबत पोलिसांचा मोठा खुलासा
अजब लग्नाची गजब गोष्ट! चक्क वयाच्या ६६ व्या वर्षी भारताचे माजी क्रिकेटपटू चढले बोहल्यावर

दरम्यान, वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी या घटनेची गांभिर्याने दखल घेतली असून यंत्रणांना हायअलर्ट मोड वर ठेवण्यात आले आहे. काही दिवसांपूर्वी दोघांनी रेल्वे स्थानक उडवून देण्याची धकमी दिली होती. तसेच स्थानक परिसरात बॉम्ब असल्याचे सांगत त्या जागा सांगण्यासाठी ७ कोटी रुपयांची मागणी केली होती. पुणे पोलिसांनी त्या दोघांना अटक केली होती.

Related Stories

No stories found.