सूर्योदय मंडळाचे साहित्य पुरस्कार जाहीर

सूर्योदय मंडळाचे साहित्य पुरस्कार जाहीर
USER

नाशिक । प्रतिनिधी Nashik

साहित्य क्षेत्रातील अग्रेसर सूर्योदय सर्वसमावेशक मंडळाच्या (Suryodaya Mandal ) एकोणीसाव्या वर्धापनदिनानिमित्त मंडळाचे अध्यक्ष सतीश जैन यांनी मराठीतून प्रकाशित झालेल्या विविध साहित्य कृतींना पुरस्कार जाहीर केले आहेत.

डॉ. मथू सावंत, विलास मोरे, सावळीराम तिदमे, साहेबराव पाटील, डी. बी. महाजन, प्रवीण लोहार यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले. जानेवारीत नियोजित पहिले अखिल भारतीय सूर्योदय मराठी साहित्य संमेलनात हे पुरस्कार प्रदान करण्यात येणार असल्याची माहिती दिली आहे.

यांना मिळाले पुरस्कार

लोणार( Lonar ) जि. बुलढाणा येथील डॉ. विशाल इंगोले यांच्या ‘माझ्या हयातीचा दाखला’ या काव्यसंग्रहाला सूर्योदय सानेगुरुजी पुरस्कार, 2100 रुपये व गौरवपत्र.

नाशिक( Nashik ) येथील अभिषेक नाशिककर यांच्या समांतर या काव्यसंग्रहाला पुरस्कार 1500 रुपये आणि गौरवपत्र. ठाण्याच्या रामदास खरे यांच्या ‘आता अटळ आहे’ या काव्यसंग्रहाला काव्यरत्न पुरस्कार,

धुळ्याच्या ( Dhule )प्रेमचंद अहिरराव यांच्या शब्दचित्र या काव्यसंग्रहाला शब्दमाऊली पुरस्कार, नांदेडच्या डॉ. योगिनी सातारकर पांडे यांच्या - शब्द जायबंदी होण्याचे दिवस या काव्यसंग्रहाला जाहीर प्रत्येकी रुपये 1109, आणि गौरवपत्र. मुंबईच्या अनुराधा नेरूरकर यांच्या सलणारा सलाम या ललित लेख संग्रहाला पुरस्कार, 2500 रुपये व गौरवपत्र.

स्व. गिरिजा कीर यांच्या स्मरणार्थ कथा पुरस्कार नाशिक येथील सप्तर्षी माळी यांच्या ‘फिंद्री’ या कथासंग्रहाला, जळगाव येथील दीपक तांबोळी यांच्या रंग हळव्या मनाचे या कथासंग्रहाला,

कापूसवाडी, जामनेर ( Kapusvadi, Jamner ) येथील प्रा. डॉ. युवराज पवार यांच्या शिकार या कथासंग्रहाला पुरस्कार प्रत्येकी रुपये 1500 गौरवपत्र, पुण्याच्या संजय ऐलवाड यांच्या बिबट्याचे पिल्लू आणि इतर कथा या बालकथासंग्रहाला राज्यस्तरीय सूर्योदय बालकथा पुरस्कार जाहीर करण्यात आला असून रुपये 1100, गौरवपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com