सुप्रिया सुळे आणि त्यांचे पती करोनाबाधित

सुप्रिया सुळे आणि त्यांचे पती करोनाबाधित

मुंबई | Mumbai

राष्ट्रवादी काँग्रेसच्या (ncp) खासदार सुप्रिया सुळे (supriya sule) आणि त्यांचे पती सदानंद सुळे (sadanand sule) यांना करोनाची (covid19) लागण झाली आहे. सुप्रिया सुळे यांनी ट्विट करत ही माहिती दिली आहे.

सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे की, "मी आणि सदानंद, आम्हा दोघांचीही करोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. काळजी करण्याचे कारण नाही पण आमच्या संपर्कात आलेल्या सर्वांनी आपली करोना टेस्ट करुन घ्यावी,ही नम्र विनंती. काळजी घ्या."

दरम्यान राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील (jayant patil) यांच्या मुलाच्या लग्नात त्याचबरोबर निहार ठाकरे आणि अंकिता पाटील यांच्या लग्नातही सुळे यांनी हजेरी लावली होती. त्यामुळे त्या अनेकांच्या संपर्कात आल्या असल्याची शक्यता आहे.

गेल्या काही दिवसांपासून राज्या करोनाचा प्रादुर्भाव मोठ्या वेगाने होत असल्याचं पहायला मिळत आहे. राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांना करोनाचा संसर्ग झाला असल्याची माहिती काल (28 डिसेंबर) समोर आली आहे. मंत्री वर्षा गायकवाड यांनी स्वत: ट्विट करुन या संदर्भात माहिती दिली होती.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com