पदवी परीक्षा : सुनावणी 31 जुलैपर्यंत स्थगित
महाराष्ट्र

पदवी परीक्षा : सुनावणी 31 जुलैपर्यंत स्थगित

यूसीजीविरोधात युवासेनेची याचिका दाखल

Dhananjay Shinde

Dhananjay Shinde

मुंबई | Mumbai -

पदवी अभ्यासक्रमांच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्यासंदर्भात यूसीजीने दिलेल्या UGC final year exams नियमावलीविरोधात युवासेनेने सर्वोच्च न्यायालयात Supreme Court याचिका दाखल केली आहे. या याचिकेवरील सुनावणी 31 जुलैपर्यंत स्थगित करण्यात आली आहे. यूजीसीला या संदर्भात उत्तर देण्यासाठी 3 दिवसांचा अवधी देण्यात आला आहे. त्यामुळे ही सुनावणी 31 जुलैपर्यंत टळली आहे.

करोनाच्या प्रादुर्भावामुळे corona राज्यातील अंतिम वर्षांतील परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत. मात्र परीक्षा रद्द करणं बेकायदा असल्याचं सांगत यूसीजीने परीक्षेसाठी मार्गदर्शक नियमावली प्रसिद्ध केली होती. या विरोधात युवासनेने हे प्रकरण थेट सर्वोच्च न्यायालयात नेले आहे. तसंच, यूजीसीने दिलेल्या नव्या सूचना रद्द करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात एका केंद्र शासित प्रदेशासह 13 राज्यातील विद्यार्थ्यांनी याचिका दाखल केली आहे. या प्रकरणी सोमवारी सुनावणी होणार होती.

Deshdoot
www.deshdoot.com