
मुंबई | Mumbai
२७ सप्टेंबर रोजी ‘कुलाबा-वांद्रे-सीप्झ मेट्रो ३’ मार्गिकेच्या आरे कारशेडविरोधातील (Aarey Carshed) याचिकांवर सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) सुनावणी होणार आहे. २७ सप्टेंबरच्या संदर्भ सूचित आरे कारशेड प्रकरण समाविष्ट करण्यात आले आहे...
मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनने (MMRC) आरे वसाहतीत कारशेडसाठी झाडे तोडून पुन्हा कामाला सुरुवात केली. यानंतर पर्यावरणप्रेमींनी याविरोधात सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) धाव घेतली.
यापूर्वी आणि आता दाखल झालेल्या एकूण सात याचिकांवर सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) एकत्रित सुनावणी घेणार आहे.
३० ऑगस्ट रोजी सुनावणी होणार होती. मात्र ही सुनावणी झाली नाही. आता न्यायालयाने (Court) सुनावणी २७ सप्टेंबर रोजी ठेवली आहे. या सुनावणीवर सर्वांचे लक्ष लागलेले आहे.