अनिल देशमुखांना सर्वोच्च न्यायालयाकडूनही दिलासा नाही

अनिल देशमुखांना सर्वोच्च न्यायालयाकडूनही दिलासा नाही

मुंबई | Mumbai

राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Former Maharashtra Home Minister Anil Deshmukh) यांच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) अनिल देशमुखांना मोठा दणका दिला आहे.

भ्रष्टाचाराच्या प्रकरणात (corruption case) सीबीआयचा (CBI) एफआयआर (FIR) रद्द करण्यास नकार देणाऱ्या मुंबई उच्च न्यायालयाच्या (Bombay High Court) आदेशाला आव्हान देणारी अनिल देशमुख यांची याचिका सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) फेटाळली आहे.

सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) याचिका फेटाळल्याने अटकेची टांगती तलवार अनिल देशमुखांवर (Anil Deshmukh) कायम आहे. अनिल देशमुख यांना आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी आत्तापर्यंत ईडीनं (ED) ५ वेळा समन्स बजावले आहे. पाचवं समन्स मंगळवारी १७ ऑगस्ट रोजी बजावलं होतं.

आज (ता. १८) त्यांना ईडीसमोर चौकशीसाठी हजर राहण्यास सांगण्यात आलं होतं. मात्र, आज देखील अनिल देशमुख चौकशीसाठी ईडीसमोर हजर झालेले नाहीत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com