शेतकऱ्यांना ठिबक सिंचनासाठी पूरक अनुदान - कृषी मंत्री दादा भुसे

अतिरिक्त आर्थिक भार राज्य सरकार उचलणार
शेतकऱ्यांना ठिबक सिंचनासाठी पूरक अनुदान - कृषी मंत्री दादा भुसे

मुंबई | प्रतिनिधी Mumbai

पंतप्रधान कृषी सिंचन योजनेसाठी Prime Minister's Agricultural Irrigation Scheme शेतकऱ्यांवर येणारा आर्थिक भार कमी करण्यासाठी राज्य सरकारने मुख्यमंत्री शाश्वत सिंचन योजनेद्वारे through CM Sustainable Irrigation Scheme ठिबक आणि तुषार सिंचनासाठी Drip and sprinkler irrigation पूरक अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे.

या योजनेमध्ये पंतप्रधान कृषी सिंचन योजनेंतर्गत अल्प आणि अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना मिळणाऱ्या ५५ टक्के अनुदानाच्या व्यतिरिक्त २५ टक्के पूरक अनुदान आणि इतर शेतक-यांना ४५ टक्के अनुदानाच्या व्यतिरिक्त ३० टक्के पूरक अनुदान देण्यास राज्य सरकारने मान्यता दिली आहे. हे पूरक अनुदान कमाल ५ हेक्टर क्षेत्राच्या मर्यादेत मिळणार असून यासाठी लागणारा अतिरिक्त आर्थिक भार राज्य सरकार उचलणार असल्याची माहिती कृषी मंत्री दादा भुसे यांनी दिली आहे.

या योजनेमध्ये राज्यातील अवर्षण प्रवण क्षेत्रातील, शेतकरी आत्महत्याग्रस्त आणि नक्षलग्रस्त अशा एकूण २४६ तालुक्यांचा समावेश होता. सरकारने उर्वरित १०६ तालुक्यांचा समावेश करुन सदर योजना राज्यातील सर्व तालुक्यांमध्ये राबविण्याचा निर्णय नुकताच मंत्रिमंडळ बैठकीत घेतला आहे. यामुळे राज्यातील सर्वच शेतक-यांना वाढीव अनुदानाचा लाभ होणार आहे.

राज्यामध्ये आतापर्यंत २५.७२ लक्ष हेक्टर क्षेत्र सूक्ष्म सिंचनाखाली आलेले असून, या नवीन योजनेमुळे अधिकाधिक शेतक-यांनी ठिबक आणि तुषार सिंचन संच बसविण्यास चालना मिळेल. सन २०२१-२२ या आर्थिक वर्षासाठी ५८९ कोटी रुपये रकमेस सरकारची प्रशासकिय मान्यता आहे. सूक्ष्म सिंचनाची योजना 'मागेल त्याला ठिबक' या तत्त्वावर राबविणार असून अर्ज केलेल्या सर्व पात्र शेतक-यांना अनुदानाचा लाभ देण्याचा सरकारचा मानस आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com