Summer Season : राज्यात उन्हाळ्याची चाहूल, जाणून घ्या प्रमुख शहरांचे तापमान

Summer Season : राज्यात उन्हाळ्याची चाहूल, जाणून घ्या प्रमुख शहरांचे तापमान

मुंबई | Mumbai

कमाल तापमानात (Maximum Temperature) झालेल्या वाढीमुळे उन्हाळ्याची चाहूल (Summer Footfall) लागली आहे. राज्यात उन्हाचा चटका (Heat) सातत्याने वाढत आहे. तर किमान तापमानातही वाढ होत आहे.

महाराष्ट्रातील बहुतांश जिल्ह्यात ३७ अंशांपर्यंत तापमान जाऊन पोहोचले आहे. यामुळे आता नागरिकांना उकाड्याचा सामना करावा लागत आहे. किमान तापमानात सातत्याने वाढ होत आहे. राज्याच्या किमान तापमानातील वाढीबरोबरच आणि किमान तापमानातील चढ-उतार सुरूच राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

राज्यातील प्रमुख शहरांचे तापमान खालीलप्रमाणे

दरम्यान, उन्हाच्या काहीलीने थंडाव्यासाठी रस्त्यावरील रसवंती गृह व शितपेयांच्या दुकानावर ग्राहकांची गर्दी वाढु लागली आहे. रसवंती गृह चालकही या हंगामी धंद्यासाठी सरसावले असून ग्राहकांना सुविधा देण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. प्रवासात उन्हाने जिवाची काहीली होत असल्याने प्रवासी आपोआपच रसवंतीगृहांचा व शितपेयांचा आश्रय घेताना दिसत आहे. ऊसाच्या थंडगार ताज्या रसाला अधिक पसंती दिली जात असल्याने रसवंती गृहे फुलून गेली आहेत.

रसवंतीगृह चालकांचा हा हंगामी व्यवसाय असल्याने ग्राहकांना आकृष्ट करण्यासाठी रसवंती चालक विविध सुविधा पुरवण्याचा प्रयत्न करीत आहेत. काही रसवंतीगृह चालकांनी ग्राहकांसाठी टेबल खुर्च्या सोबतच चोपाळे, लहान मुलांसाठी झोके, खेळणी आदी वस्तू ठेवल्या आहेत. वाढत्या महागाई सोबतच यंदा उसाचा ताजा रसही 10 ऐवजी 15 रुपयाला विकला जात आहे. शहराच्या परीसरात तर हा दर 20 रुपये आहे. गारव्यासाठी काही ठिकाणी बर्फाचा वापर टाळुन थेट डिपफ्रिजमध्ये थंड केलेल्या ऊसाचा ताजा रस दिला जावू लागला आहे. त्यामुळे बर्फाची अ‍ॅलर्जी असलेले प्रवासी थेट हा थंडगार रस पिण्याला पसंती देताना दिसत आहेत.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com