मैत्रिणीने गळफास घेतल्याचे समजताच 'ती'नेही उचलले टोकाचे पाऊल

मैत्रिणीने गळफास घेतल्याचे समजताच 'ती'नेही  उचलले टोकाचे पाऊल

हडपसर | Hadapsar

शेवाळवाडी (Shewalwadi) येथे दोन मैत्रीणींने आत्महत्या (Suicide) केली आहे. हा धक्कादायक प्रकार सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास घडला आहे. आकांक्षा औदुंबर गायकवाड (वय १९) व सानिका हरिश्चंद्र भागवत (वय १९) अशी आत्महत्या केलेल्या तरूणींची नावे आहेत. या प्रकाराने परिसरात एकच खळबळ उडाली आहे....

या दोन्ही तरुणींपैकी एकीने गळफास लावून तर दुसरीने पाचव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली आहे. आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही.

गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेजवळ अभिनंदन क्रिस्टल टॉवर या इमारतीमध्ये सायंकाळी सात वाजेच्या सुमारास घडला आहे. सानिकाने सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास अभिनंदन इमारतीमधील आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली.

मैत्रिणीने गळफास घेतल्याचे समजताच 'ती'नेही  उचलले टोकाचे पाऊल
धक्कदायक! गैरसमजातून साधूंना बेदम मारहाण

आकांक्षाला हे समजल्यावर ती सानिकाच्या घरी गेली होती. या घटनेचा धक्का सहन न झाल्याने तीनेही याच इमारतीच्या टेरेसवरून सायंकाळी सातच्या सुमारास उडी मारून आत्महत्या केली.

आकांक्षा व सानिका या दोघीही बाल मैत्रिणी होत्या. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी आले. रुग्णवाहिकेतून सानिकाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी घेऊन जात असताना आकांक्षाने पाहिले.

त्याचवेळी आकांक्षाने पाचव्या मजल्यावरून रुग्णवाहिकेजवळ उडी मारली. त्यातच तिचा जागीच मृत्यू झाला. पोलीस पुढील तपास करीत आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com