
सांगली | Sangali
येथील मिरज (Miraj) तालुक्यातील म्हैसाळे (Mhaisale) येथे एका डॉक्टर दाम्पत्याच्या घरातील एकाच वेळी नऊ जणांनी विष प्राशन करून आत्महत्या (Suicide) केल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे....
डॉक्टर दाम्पत्याच्या घरात सहा मृतदेह तर दुसऱ्या घरात तीन मृतदेह मिळून आले आहेत. घटनास्थळी पोलिस (Police) पंचनामा करण्यात आला आहे. या कुटुंबाने कर्जबाजारीपणातून सामूहिक आत्महत्या केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.
पोपट यल्लाप्पा वनमोरे (52), संगीता पोपट वनमोरे (48), शुभम पोपट वनमोरे (वय 28), अर्चना पोपट वनमोरे (30), रेखा माणिक वनमोरे (वय 45), माणिक यल्लाप्पा वनमोरे (49), अनिता माणिक वनमोरे (वय 28) आदित्य माणिक वनमोरे (15) आणि अक्काताई वनमोरे (72) अशी आत्महत्या केलेल्यांची नावे आहेत.