स्पर्धा परीक्षेच्या आणखी एका विद्यार्थ्याची आत्महत्या; नैराश्यातून उचलले पाऊल

स्पर्धा परीक्षेच्या आणखी एका विद्यार्थ्याची आत्महत्या; नैराश्यातून उचलले पाऊल

पुणे | Pune

येथील स्वप्नील लोणकर (Swapnil Lonkar) या एमपीएससीच्या (MPSC) उमेदवाराने आत्महत्या केल्याची घटना काही दिवसांपूर्वीच घडली होती. त्यानंतर आता पुण्यातून आणखी एक धकाकदायक घटना उघडकीस आली आहे...

पुण्यात राहून पीएसआयचा (PSI) अभ्यास करणाऱ्या एका विद्यार्थ्यांने आत्महत्या केली आहे. सदाशिव पेठे येथे या विद्यार्थ्याने आत्महत्या केली. अमर मोहिते (Amar Mohite) असे त्याचे नाव आहे. या विद्यार्थ्याने अचानक आत्महत्या केल्यामुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

अमर मोहिते हा मूळचा सांगली जिल्ह्याचा रहिवासी होता. तो पुण्यात अभ्यास करण्यासाठी आला होता. राज्य लोकसेवा आयोग म्हणजेच एमपीएससीची तो तयारी करत होता. मागील दोन वर्षांपासून तो पीएसआयची तयारी कारत होता. मराठा आरक्षण (Maratha Reservation) रद्द झाल्याने तो पीएसआयच्या फिजिकलमधून बाहेर पडल्याने अमर नैराश्यात होता अशी माहिती समोर आली आहे.

गेल्या दीड वर्षांपासून करोनामुळे एमपीएससीच्या विद्यार्थ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यात परीक्षा रद्द होणे, पुढे ढकलणे आणि नियुक्ती न मिळेल यावरून अनेक विद्यार्थी नैराश्यात आहेत. यातच मागील वर्षी स्वप्नील लोणकर या एमपीएससीच्या विद्यार्थ्यानं आत्महत्या केल्याची घटना घडली होती. यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात आंदोलनं करण्यात आली होती. एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचा मुद्दा चांगलाच तापला होता.

यानंतर मराठा आरक्षणाच्या मुद्द्याने अनेक होतकरू विद्यार्थ्यांना धक्का बसला होता. मराठा आरक्षण अचानक रद्द झाले आणि अनेक विद्यार्थ्यांना भरतीला मुकावे लागले. अमर मोहिते या विद्यार्थ्यांचंही सिलेक्शन झाले होते. मात्र मराठी आरक्षण रद्द झाले आणि अमरला फीझीकलमधून बाहेर पडावे लागले होते. त्यामुळे त्याने हे पाऊल उचलले अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com