धक्कादायक! एकाच कुटुंबातील ७ जणांची आत्महत्या

धक्कादायक! एकाच कुटुंबातील ७ जणांची आत्महत्या

पुणे | Pune

पुण्यात एकाच कुटुंबातील सात जणांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पुण्याच्या दौंड तालुका भागात ही घटना उघडकीस आली आहे आहे. आत्महत्या केलेल्यांचे मृतदेह नदीकाठी आढळले असून यामुळे परिसरात मोठी खळबळ उडाल्याचे चित्र आहे....

याबाबत अधिक माहिती अशी की, पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील भीमा नदीत चार मृतदेह आढळून आले होते. ते मृतदेह एकाच कुटुंबातील असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. पती-पत्नी मुलगी आणि जावई यांचे चार मृतदेह आढळून आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

धक्कादायक! एकाच कुटुंबातील ७ जणांची आत्महत्या
Video : 'त्यांनी' जिद्दीने विस्तारला शेतीचा पट; 'पाहा' शेतकरी महिलेची यशोगाथा

पारगाव हद्दीत हे मृतदेह आढळून आलेत. मृतदेह सहा दिवसांपूर्वीच आढळून आले होते. या मृतदेहांची ओळख आता पटली आहे. चार मृतदेह नगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील व्यक्तींचे असल्याची माहिती समोर येत आहे. चार जणांनी आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.

धक्कादायक! एकाच कुटुंबातील ७ जणांची आत्महत्या
संतापजनक! महिलेची हत्या करून तिच्या मृतदेहावर अत्याचार

या कुटुंबातील आणखी तीन लहान मुले बेपत्ता आहेत. मोहन उत्तम पवार, संगिता मोहन पवार, राणी शाम फुलवरे, शाम फुलवरे अशी मृतांची नावे आहेत. या कुटुंबासोबत चार वर्षाच्या आतील ३ लहान मुले अद्याप बेपत्ता आहेत.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com