राज्यातील ऊसतोड कामगारांना मिळणार ‘आयकार्ड’

राज्यातील ऊसतोड कामगारांना मिळणार ‘आयकार्ड’

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

ऊसतोड कामगार (Sugarcane Workers) व त्यांच्या कुटुंबियांची नोंदणी ग्रामसेवकामार्फत करण्यात येणार आहे. तसेच त्यांना ओळखपत्र (Identity Card) देण्याचा शासन निर्णय निर्गमित झाला आहे…

कुठल्याही दस्त ऐवजात ‘ऊसतोड कामगार’ अशी नोंदणी नसलेल्या लाखो असंघटित ऊसतोड कामगारांच्या जीवनाशी निगडित विषयात समाज कल्याण विभागाने (Social Welfare Department) हे महत्वपूर्ण पाऊल उचलले आहे.

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत गोपीनाथराव मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ प्रत्यक्ष ऊसतोड कामगारांना देण्यात येणार आहे.

त्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून प्रत्येक जिल्ह्यातील ऊसतोड कामगार व त्यांच्या कुटुंबियांची नोंदणी ग्रामसेवकामार्फत करण्यात येणार आहे. याबाबतचा शासन निर्णय, नोंदणी करावयाचा नमुना फॉर्म व ओळखपत्राचा नमुनादेखील निर्गमित करण्यात आला आहे.

नोंदणी यावर्षीच्या सिझनला कामगार स्थलांतरीत होण्यापूर्वीच केली जावी. स्थानिक राजकारण, गाव स्तरावरील गटबाजी किंवा पक्षपात अशा कोणत्याही बाबींचा परिणाम न होऊ देता पारदर्शक पद्धतीने सरसकट ऊसतोडणी कामगारांची नोंदणी करून त्यांना ओळखपत्र दिले जावे, अशा सक्तीच्या सूचना मंत्री धनंजय मुंडे (Cabinet Minister Dhananjay Munde) यांनी दिल्या आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com