
नेवासा | Newasa
यंदाचे सध्या सुरू असलेल्या गळीत हंगामात राज्यातील एकूण 200 साखर कारखान्यांनी 28 मे 2022 अखेर 1314.54 लाख मेट्रिक टन ऊसाचे गाळप करून 1367.27 लाख क्विंटल साखर उत्पादित केली आहे.राज्याचा सरासरी साखर उतारा 10.40 टक्के आहे.
200 पैकी 165 कारखान्यांचे हंगाम बंद झाले असून अद्यापही 35 कारखाने सुरू आहेत. तर नगर जिल्ह्यातील 22 कारखान्यांनी 1 कोटी 83 लाख 66 हजार 454 मेट्रिक टन उसाचे गाळप पूर्ण केले आहे. 14 साखर कारखान्याचे गळीत हंगाम बंद झाले असून 8 कारखाने अद्यापही सुरूच आहेत. जिल्ह्यात ऊस गाळपात अंबालिका (खासगीत) व ज्ञानेश्वर साखर कारखाना (सहकारात) आघाडीवर आहे.
15 ऑक्टोंबर रोजी राज्यातील ऊस गाळपाला सुरवात झाली होती. मागील पावसाळ्यात अतिवृष्टीमुळे इतर पिकांचे नुकसान झाले असले तरी सर्वात मोठे नगदी पीक असलेल्या ऊसाला यामुळे कोणताही धोका निर्माण झाला नव्हता. उलट जिरायत क्षेत्रावरील ऊसाचे उत्पादन या अधिकच्या पावसामुळे वाढलेले होते. आता हंगाम सुरु होऊन सात महिने पूर्ण होत आहे.
नगर जिल्ह्यातील 22 कारखान्यांकडून 1 कोटी 83 लाख टन उसाचे गाळप पूर्ण...
नगर जिल्ह्यातील 14 सहकारी व 8 खाजगी अशा एकूण 22 साखर कारखान्यांनी 28 मे 2022 2022 अखेर 1 कोटी 83 लाख 66 हजार 454 मेट्रिक टन उसाचे गाळप करून 1 कोटी 83 लाख 78 हजार 188 क्विंटल साखर निर्मिती केली आहे.जिल्ह्याचा सरासरी साखर उतारा 10.01 टक्के आहे.
नगर जिल्ह्यात 14 सहकारी साखर कारखान्यांनी 1 कोटी 25 लाख 34 हजार 745 मेट्रिक टन तर 8 खासगी साखर कारखान्यांनी 58 लाख 31 हजार 709 टन ऊसाचे गाळप पूर्ण केलेले आहे.
22 पैकी 14 कारखान्याचे हंगाम बंद झाले असून 8 कारखाने अद्यापही सुरूच आहेत.
यंदाचा ऊस गळीत हंगाम 15 ऑक्टोबर 2021 रोजी सुरू झाला होता. नगर जिल्ह्यातील 23 पैकी 22 साखर कारखान्याचे हंगाम सुरू होते. नेवासा तालुक्यातील भेंडा येथील लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याने 16 लाख 50 हजार मेट्रिक टन ऊसाचे गाळप करून नगर जिल्ह्यातील सहकारी साखर कारखान्यामध्ये तर अंबालिका या खाजगी साखर कारखान्याने 19 लाख 51 हजार 160 मेट्रिक टन ऊसाचे गाळप करून जिल्ह्यात आघाडी घेतलेली आहे.
इथेनॉल निर्मिती धोरण...
केंद्र सरकारकडून देशात 1000 इथेनॉल प्रकल्पांना (आसवनी) यापूर्वीच मान्यता देण्यात आलेली आहे. 650 प्रकल्पांमध्ये धान्यावर प्रक्रिया, 350 साखर कारखान्यांमधून इथेनॉल निर्मिती.या सर्व प्रकल्पांमधून सुमारे दीड हजार कोटी लिटर इथेनॉलचे वार्षिक उत्पादन अपेक्षित आहे.
सध्या महाराष्ट्रात 71 साखर कारखान्यांकडून इथेनॉल निर्मिती सुरू
आहे.2021 मध्ये देशात तीनशे कोटी लिटर आणि महाराष्ट्रात 80 कोटी लिटर इथेनॉलचे उत्पादन झाले.2022 मध्ये देशात 550 कोटी लिटर आणि राज्यात 140 कोटी लिटर इथेनॉल उत्पादनाचे लक्ष्य असून त्यापैकी राज्यात आज अखेर सुमारे 35 कोटी लिटर हुन अधिक इथेनॉल निर्मिती झाली आहे.
केंद्र सरकारने 2022 पर्यंत 10 टक्के तर 1 एप्रिल 2023 हा दिवस 20 टक्के इथेनॉल पेट्रोलमध्ये मिसळण्याचे (पेट्रोल-इथेनॉल ब्लेंडिंग) लक्ष्य पेट्रोलमध्ये इथेनॉल मिश्रणाचे प्रमाण धोरण आहे. 8 टक्के अपेक्षित उत्पादन झाल्यास पेट्रोलमध्ये इथेनॉलचे मिश्रणाचे प्रमाण 10 टक्क्यांपर्यंत जाणार आहे.
या गळीत हंगामात अतिरिक्त साखरे ला पर्याय म्हणून ऊसाचा रस,सिरप, बी-हेव्ही मोलासेस पासून इथेनॉल निर्मिती बरोबरच रॉ शुगर तयार करण्याकडे ही साखर कारखाना व्यवस्थापनाचा कल दिसून आला.
राज्यातील विभागनिहाय कारखान्यांचे 28 मे 2022 पर्यंतचे ऊस गाळप, साखर उत्पादन व साखर उतारा
विभाग | ऊस गाळप लाख टन |साखर उत्पादन लाख क्विंटल|उतारा टक्के| हंगाम बंद
कोल्हापूर 254.69 300.41 11.80 36
पुणे 269.70 291.07 10.79 28
सोलापूर 299.90 283.70 9.46 44
अहमदनगर 198.92 199.28 10.02 19
औरंगाबाद 130.83 127.57 9.75 13
नांदेड 145.93 151.76 10.40 19
अमरावती 10.03 9.67 9.64 02
नागपूर 4.54 3.81 8.39 04
एकूण 1314.54 1367.27 10.40 165
नगर जिल्ह्यातील 22 साखर कारखान्यांनी 28 मे 2022 अखेर केलेले ऊस गाळप, साखर उत्पादन व उतारा
अ.नं. कारखाना ऊस गाळप साखर उत्पादन उतारा
मे. टन क्विंटल टक्के
1) अंबालिका 19,51,160 21,00,650 10.77
2) ज्ञानेश्वर 16,50,000 16,89,700 10.24
3) संगमनेर 14,97,210 15,75,080 10.52
4) मुळा 14,99,690 13,18,250 8.79
5) गंगामाई 14,03,160 13,40,350 9.55
6) श्रीगोंदा 8,94,630 9,78,208 10.93
7) कुकडी 7,98,008 8,00,400 10.03
8) प्रवरा 10,33,800 7,53,475 7.29
9) संजीवनी 9,31,653 8,30,925 8.92
10) कोपरगाव 7,97,688 8,76,400 10.99
11) अशोक 8,15,750 9,15,600 11.22
12) प्रसाद शुगर 7,66,901 7,70,000 10.04
13) गणेश 3,96,000 3,02,875 7.65
14) राहुरी 4,85,272 5,49,925 11.33
15) वृद्धेश्वर 5,66,165 6,07,600 10.73
16) अगस्ती 6,22,600 7,24,630 11.64
17) केदारेश्वर 5,46,280 5,21,600 9.55
18) साईकृपा 2,50,972 2,60,700 10.39
19) जय श्रीराम 3,27,027 3,12,740 9.56
20) युटेक 4,43,454 4,44,200 10.02
21) क्रांती शुगर 1,43,616 1,54,875 10.78
22) पियुष 2,78,542 2,84,225 10.20
एकूण 1,83,66,454 1,83,78,188 10.01
जवळपास 30 टक्के अधिक गाळप व साखर उत्पादन
मागील गळीत हंगामात 28 मे अखेर राज्यातील 190 साखर कारखान्यांनी 1013.62 लाख मेट्रिक टन उसाचे गाळप करून 1064.06 लाख क्विंटल साखरेचे उत्पादन केले होते. या गळीत हंगामात 200 साखर कारखान्यांनी 1314.54 लाख मेट्रिक टन ऊसाचे गाळप करून 1367.27 लाख क्विंटल साखरेचे उत्पादन केले आहे. मागील हंगामाच्या तुलनेत या हंगामात 300.92 लाख मेट्रिक टन उसाचे जास्तीचे गाळप होऊन 303.21 लाख क्विंटल जास्त साखर उत्पादित केली आहे.गाळप हंगाम 2021-22 मध्ये राज्यात एकूण 12.32 लाख हेक्टर क्षेत्रावर ऊस उपलब्ध होता. 2020- 21 मध्ये 11.42 लाख हे. क्षेत्र ऊस पिकाखाली होते. मागील हंगामच्या तुलनेत 90 हजार हेक्टर ऊस क्षेत्र जास्त होते.
नगर जिल्ह्यात हंगाम सुरू असलेले कारखाने
नगर जिल्ह्यातील ज्ञानेश्वर, संगमनेर, मुळा, प्रवरा, कोपरगाव, अशोक, गणेश व वृद्धेश्वर या 8 कारखान्यांचे हंगाम मे अखेर सुरु आहेत. उर्वरीत 14 कारखन्यांचे हंगाम बंद झाले आहेत.