साखर कारखानदारांनी कोविड हॉस्पिटल उभारावे
महाराष्ट्र

साखर कारखानदारांनी कोविड हॉस्पिटल उभारावे

शरद पवार यांची सूचना

Dhananjay Shinde

Dhananjay Shinde

सातारा | Satara -

राज्यात करोना संकटाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता रुग्णसेवेसाठी हॉस्पिटलांची संख्या वाढविण्याची गरज आहे ही गरज लक्षात घेऊन सहकारी साखर कारखानदारांना sugar mill owners कोविड हॉस्पिटल त्वरित उभारायला सांगा. साखर सचिवांना सांगून याबाबतचे परिपत्रक जारी करा अशा सूचना राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांना केल्या.Ncp Chief Sharad Pawar

सातारा जिल्ह्यातील कर्‍हाड येथे रविवारी सातारा, कोल्हापूर जिल्ह्यांतील लोकप्रतिनिधी व अधिकार्‍यांंची आढावा बैठक झाली. त्या बैठकीदरम्यान शरद पवार यांनी सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांना वरील सूचना केली. यावेळी आरोग्यमंत्री राजेश टोपे, राजेंद्र पाटील-यड्रावकर, गृहराज्यमंत्री शंभूराजे देसाई, सतेज पाटील यांची उपस्थिती होती.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com